Rana Daggubati: दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीचा (Rana Daggubati) चाहता वर्ग मोठा आहे. राणाला बाहुबली (Baahubali) या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भल्लाल देव ही भूमिका राणानं साकारली. नुकताच राणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राणा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबात बोलताना दिसत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की राणा साऊथ चित्रपटांच्या यशाबाबात बोलत आहे. तो म्हणतो, 'सध्या साऊथ चित्रपट नक्कीच चांगले कलेक्शन करत आहेत, पण पाच वर्षांपूर्वी  लोक साऊथच्या चित्रपटांची खिल्ली उडवायचे. अशा परिस्थितीत आता साऊथचे चित्रपटांना कसे यश मिळत आहे हे तुम्ही आणि आपण सगळेच बघत आहोत.' 


पाहा व्हिडीओ






राणाचे आगामी प्रोजेक्ट्स


राणा डग्गुबती एका आगामी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राणा डग्गुबतीच्य आगामी वेब सीरिजची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. दोन महिन्यांपूर्वी राणा दग्गुबतीच्या या क्राईम थ्रिलर वेब सीरिजचा टीझरही नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. या सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा अजून करण्यात आलेली नाही. राणा नायडू (Rana Naidu)  असं या सीरिजचं नाव आहे. 



राणाचा 'विराटपर्वम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात तो साई पल्लवीसोबत रोमान्स करताना दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Video : राणा दग्गुबातीने हिसकावला सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याचा फोन, रागावण्याऐवजी चाहते झाले खुश! पाहा नेमकं काय झालं...