Urfi Javed Net Worth : आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल' उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. उर्फी जावेदने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. उर्फी जावेद कोट्यवधींची मालकीण असून फारच लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. पण अनेकांना प्रश्न पडला असेल, उर्फी जावेदची कमाई आणि संपत्ती नेमकी नक्की किती आहे, हे जाणून घ्या.


सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या ऑफबीट फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच ट्रोल होत असते. पण उर्फीवर याचा काहीही परिणाम होत नाही आणि ती तिचे सुंदर आणि स्टायलिश फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. याद्वारे ती भरपूर कमाई करते.


कोण आहे उर्फी जावेद?


उर्फी जावेदचा जन्म 1996 मध्ये लखनौमध्ये झाला. उर्फी सध्या मुंबईत राहते आणि तिचा एका आलिशान फ्लॅट आहे. उर्फी जावेदने फॅशनिस्टा बनण्यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने 'दुर्गा', 'सात फेरी की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' यासारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. पण तिला खरी प्रसिद्धी बिग बॉस OTT मधून मिळाली.






 


उर्फी जावेदची कमाई आणि संपत्ती किती?


उर्फी जावेद एका टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी 30,000 ते 40,000 रुपये फी घेते. उर्फी जावेद जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावते. तिचे तीन मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी दरमहा 1.5 कोटी रुपये कमावते, ज्यामुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. या सर्वांशिवाय उर्फी जावेदकडे आलिशान कारही आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या


Urfi Javed : प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करणारी उर्फी जावेद कोण? कॉन्ट्रोव्हर्सी गर्लबद्दल सर्व काही जाणून घ्या