Tunisha Sharma Case: काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) मालिकेच्या शुटिंग सेटवरच आत्महत्या केली आणि संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरलं. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा मित्र शीझान खानला (Sheezan Khan) अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. अशातच तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा (Vanita Sharma) यांनी आरोपी शीझान खानवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. अशातच त्यांना आता शीझानवर एक नवा आरोप केला आहे. तसेच, तुनिषाची हत्याच आहे, असा आरोपही यावेळी बोलताना पुन्हा एकदा तुनिषाच्या आईनं केला आहे.
दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, शीझान खान सेटपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल असतानाही तिला खूप लांब असलेल्या रुग्णालयात घेऊन गेला. रविवारी माध्यमांशी तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी संवाद साधला. त्याचवेळी तुनिषासोबत आपेल संबंध चांगले असल्याचंही वनिता शर्मा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी तुनिषाचा एक व्हॉईस मेसेजही दाखवला.
शीझानसोबत ब्रेकअप झाल्याच्या अवघ्या 15 दिवसांतच, म्हणजेच 24 डिसेंबर रोजी तुनिषानं सेटवर आत्महत्या केली होती. याच प्रकरणी तुनिषाचा सहकलाकार आणि मित्र शीझान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. शीझान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. शीझान आणि तुनिषा यांच्या कुटुंबीयांकडून माध्यमांसमोर दररोज नवनवे खुलासे केले जात आहेत. तसेच, एकमेकांवर आरोपही केले जात आहेत.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, "ही हत्या असू शकते. कारण शीझानला तुनिषाला जवळच्या रूग्णालयात नेता आलं असतं. पण त्यानं तसं केलं नाही. सेटपासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर रुग्णालयं होती. पण तिला जवळच्या रुग्णालयात का नेलं नाही? तिचा श्वास सुरू होता, तिला वाचवणं शक्य होतं."
तुनिषाबाबतही केला अनेक गोष्टींचा खुलासा
तुनिषाच्या आईनं असंही सांगितलं की, "माझ्या आणि तुनिषामध्ये कोणतंही भांडण नव्हतं. माझे तिच्याशी खूप चांगले संबंध होते. ती माझ्याशिवाय राहूच शकत नव्हती, तिला माझ्याशिवाय झोपही यायची नाही. माझ्याकडे तिचा एक व्हॉईस मेसेज आहे, जो तिने 21 डिसेंबरला मला पाठवला होता." तुनिषाच्या आईनं माध्यमांसमोर एक व्हाईस मेसेज ठेवला. व्हॉईस मेसेजमध्ये ट्युनिशा म्हणाली की, "मामा, मी तुझ्यावर किती प्रेम करते, हे मी सांगू शकत नाही."
शनिवारी वसई न्यायालयानं शीझानच्या जामीन अर्जावरील सुनावणी 9 जानेवारीपर्यंत तहकूब केली होती. आज प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. वनिता यांनी याआधी शीजनवर तुनिषाला मारहाण केल्याचा आणि तिला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.
पत्रकार परिषदेत बोलताना, शीझानची बहीण फलक नाझ हिनं तुनिषाच्या आईवर तुनिषाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आणि सांगितलं की, तुनिषा लहानपणापासूनच डिप्रेशनमध्ये होती. तुनिषाच्या आईनंही कबूल केल्याचा दावा शीझानच्या बहिणीनं केला होता. तसेच, आईनं लहानपणापासूनच तुनिषाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुनिषा नैराश्यात होती, असंही ती म्हणाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :