नवी दिल्ली: 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या पर्वाची सुरुवात नुकतीच झाली. या पर्वाच्या पहिल्याच कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्या उपस्थितीने सर्वत्र चर्चा झाली. आता दुसऱ्या शोमध्ये बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी उपस्थिती लावली.


या कार्यक्रमाचा प्रोमो स्टार वर्ल्ड इंडियाने नुकताच रिलीज झाला असून, हा प्रोमो पाहताना पहिल्या कार्यक्रमाप्रमाणेच या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सूकता आहे. विशेष म्हणजे या प्रोमोत करणने ट्विंकलला विचारलेल्या प्रश्नांमुळे अक्षयची बोलती बंद होत असल्याचे वारंवार पाहायला मिळत होते.

एका प्रश्नाचे उत्तर देताना ट्विंकल म्हणाली की, ''मी अक्षयला स्पष्ट सांगितलं आहे की, ''जोपर्यंत तो सेंसिबल मूव्ही करण्यास सुरुवात करत नाही, तोपर्यंत दुसऱ्या मुलाला मी जन्म देणार नाही.'' यानंतर अक्षयने आपल्याकडे बोलण्यासाठी शब्दच नसल्याचे प्रांजळपणे कबुल केले.

यानंतर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहरने अक्षयची तुलना बॉलिवूडच्या तीन खानांसोबत करुन अक्षयमध्ये असे काय गुण आहेत, जे या तिन्ही खानमध्ये नाहीत? असा प्रश्न विचारला. यावर ट्विंकलचेही उत्तर हटके होते. ती करणला म्हणाली की, अक्षयकडे, एक्स्ट्रा इंचेज आहेत....

कार्यक्रमाचा प्रोमाे पाहा