Kanishka Soni : सध्या स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेंड सुरु आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या क्षमा बिंदू (Kshama Bindu) या मुलीने स्वत:शी लग्न करुन या ट्रेंडला सुरुवात केली. आता छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीनं देखील स्वत:शी लग्न केलं आहे. कनिष्का सोनी (Kanishka Soni)  ही अभिनेत्री गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर लाऊन फोटो शेअर करत असते. एक पोस्ट शेअर करुन कनिष्कानं स्वत:शीच लग्न केल्याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं. या ट्रोलर्सला कनिष्कानं उत्तर दिलं आहे. 


कनिष्काची पोस्ट चर्चेत 
काही दिवसांपूर्वी कनिष्कानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कनिष्का ही मंगळसूत्र आणि सिंदूर फ्लॉन्ट करताना दिसत होती. या फोटोला कनिष्कानं कॅप्शन दिलं, 'मी स्वत:शी लग्न केलं आहे. मी माझी स्वप्न स्वत: पूर्ण केली आहे. मी फक्त स्वत:वर प्रेम करते. मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. मी एकटीच राहणार आहे. मी माझ्या गिटारसोबत खुष आहे. मी देवी आहे, बलवान आणि सामर्थ्यवान आहे, शिव आणि शक्ती सर्व काही माझ्यात आहे, धन्यवाद.' कनिष्काच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. या पोस्टनंतर काहींनी कनिष्काचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल केलं. 






ट्रोलर्सला कनिष्कानं दिलं उत्तर 
'मला माहित आहे की काही लोक माझ्या सेल्फ मॅरेजच्या निर्णयावरुन मला ट्रोल करत आहेत. मी भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवते. मी विचार करुनच एकटं राहण्याचा निर्णय घेतला. लग्न हे केवळ लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केलं जात नाही. प्रेम आणि प्रामाणिकपणा या गोष्टी असला की लग्न होते, ही गोष्ट प्रत्येकाला हवी असते पण मी याबाबत विश्वास गमावला आहे. म्हणून मी बाहेरच्या जगात प्रेम  शोधण्यापेक्षा एकटे राहण्याचा निर्णय घेतला. स्वतःवर प्रेम करणे चांगले आहे. मला हे करुन कोणतीही बातमी तयार करायची नव्हती. पण माझी पोस्ट ट्रेंड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. काही लोकांना वाटलं मी हे सर्व नशेत असताना केलं. पण असं नाहीये. मी आता हॉलिवूडमध्ये करिअर करायची तयारी करत आहे आणि त्याकडे मी माझं लक्ष केंद्रित केलं आहे. ', अशी पोस्ट शेअर करुन कनिष्कानं ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 


कनिष्कानं मालिकांमध्ये केलं काम
‘दीया और बाती हम’, ‘पवित्र रिश्ता’,‘कुल्फी कुमार बाजेवाला’आणि ‘देवी’यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये  कनिष्कानं काम केलं आहे. आता लवकरच कनिष्का हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती कॅनडाच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करणार आहे. 


वाचा इतर सविस्तर बातम्या: 


Kshama Bindu : स्वत:शीच शुभमंगल सावधान! अखेर क्षमा बिंदुचा बहुचर्चित आत्मविवाह संपन्न