OnlyFans Model Ezra Vandan Arrested: OnlyFans फेम प्रसिद्ध मॉडेल एज्रा वंदन (Ezra Vandan), जिला अजरा अय वंदन म्हणूनही ओळखलं जातं. ही एक तुर्की (Turkey) ओन्ली फॅन्स मॉडेल (OnlyFans Model) आहे. पण, सध्या ती मोठ्या अडचणीत सापडली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. मॉडेलच्या अडचणी वाढण्यासाठी तिनं केलेलं एक वक्तव्यच कारणीभूत ठरलं आहे. एज्रा वंदननं 24 तासांत 100 पुरुषांसोबत झोपण्याच्या प्लानची घोषणा केली आणि सर्वांना भोवळ आली. दरम्यान, एज्रा वंदनच्या जाहीर घोषणेनंतर पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी तुर्कीची राजधानी इस्तंबूलमधून (Istanbul) एज्रा वंदनला अटक केली.
डेली मेलनं (Daily Mail) दिलेल्या वृत्तानुसार, लोकप्रिय मॉडेलला अटक केल्यानंतर, तुर्की पोलिसांनी सांगितलं की, मॉडेलच्या योजना अश्लील आणि तुर्कीच्या नैतिक मानकांसाठी धोकादायक होत्या. त्यामुळे तिला तात्काळ अटक करण्यात आली.
23 वर्षीय मॉडेल एज्रा वंदननं 14 जानेवारी रोजी सोशल मीडियावर आपल्या इच्छा जाहीर केल्या. तिनं सांगितलं की, तिला इतक्या मोठ्या प्रमाणात सेक्स करायचा आहे की, ती पहिला तुर्की रेकॉर्ड आणि जागतिक रेकॉर्ड दोन्ही मोडू शकेल. "माझं ध्येय सर्वात आधी तुर्कीचा विक्रम मोडणं आहे, नंतर जागतिक विक्रम!" तिच्या इच्छा जाहीर करताना, तिनं लाल रंगाची अंतवस्त्र परिधान केली होती, तिनं आपला एक बोल्ड फोटोही शेअर केलेला. त्यालोबतच तिनं "मी 24तासांत 100 पुरूषांपासून सुरुवात करत आहे.", असं म्हटलं होतं.
एज्रा वंदनला अटक
तिच्या घोषणेनंतर, इस्तंबूल सुरक्षा शाखा संचालनालयाच्या नैतिकता ब्युरोनं तिच्या वक्तव्याची ताबडतोब दखल घेतली आणि चौकशी सुरू केली. ज्यानंतर त्यांनी मॉडेलला अटक केली. तिला अताशेहिर रुग्णालयातून अटक करण्यात आली, जिथे ती कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी गेली होती. तिच्या अटकेचं एक फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये एज्रा वंदन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत होती आणि दोन महिला अधिकारी तिला मनगट पाठीमागे बांधून घेऊन जात होत्या.
त्यावेळी ती जीन्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसली. "सार्वजनिक सभ्यतेच्या विरुद्ध जाणाऱ्या तिच्या कृत्यांसाठी तिला अटक करण्यात आली", असं तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि अशा कृत्यांसाठी देशाच्या कायदेशीर परिणामांवर प्रकाश टाकला.
एज्रा वंदन कोण आहे?
बहुसंख्य मुस्लिम देश असलेल्या तुर्कीनं 2023 मध्ये ओन्लीफॅन्सवर बंदी घातली होती. पण, बंदी असूनही अनेक युजर्स कंटेंड अपलोड करत होते. उत्तेजक पोस्ट आणि लैंगिक दाव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एज्रा वंदनला तुर्कीमध्ये लोकप्रियता मिळाली आणि तिचे ओन्लीफॅन्स अकाउंट सुरू केल्यानंतर तिने 4,16,000 इंस्टाग्राम फॉलोअर्स देखील मिळवले. याव्यतिरिक्त, ओन्लीफॅन्सच्या निर्मात्या बोनी ब्लू यांच्याकडे एका दिवसात 1,057 पुरुषांसोबत झोपण्याचा विक्रम रचला आहे.