Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.


3. टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.


5. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.


6. 'आता होऊ दे धिंगाणा' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.  


7. टीआरपीच्या शर्यतीत 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे. 


8. 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे. 


9. नव्या स्थानावर 'स्वाभीमान' ही मालिका आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे. 


10. 'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे.


'माझी तुझी रेशीमगाठ' पहिल्या दहातून बाद


'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या दहातून बाद झाली आहे. तर 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेच्या महाएपिसोडला 5.4 रेटिंग मिळाले आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या महाएपिसोडला 4.4 रेटिंग मिळाले आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेची वेळ बदल्यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतून बाद झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


संबंधित बातम्या


Marathi Serial : 'तुझेच मी गीत गात आहे' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; 'रंग माझा वेगळा' पडली मागे


Priya Bapat : नाटकाच्या प्रयोगादरम्यान लघुशंका आली अन्...; 'बस बाई बस'च्या मंचावर प्रिया बापटने शेअर केला भन्नाट किस्सा