Abhinay Berde : मराठमोळा अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा लाडका लेक म्हणजेच अभिनय बेर्डेचा (Abhinay Berde) 'डान्स महाराष्ट्र डान्स' कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "भूमिका कुठलीही असो हजार टेंशन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकीटाबरोबर मन भरुन लाफ्टर घेऊन गेला पाहिजे", असं अभिनय बेर्डे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
अभिनय बेर्डेच्या व्हिडीने सर्वांनाच भावूक केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत डोळ्यात पाणी आणतो. 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या आगामी भागात अभिनय बेर्डे आपल्या वडिलांना म्हणजेच दिवंगत अभिनते लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावूक कॉल करताना दिसणार आहे.
सध्या अभिनयने लक्ष्मीकांत बेर्डेंना केलेला कॉल व्हायरल होत आहे. लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेला सल्ला अभिनय कॉलच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अभिनय म्हणतो आहे," बाबा काय बोलू कशी सुरुवात करू कळत नाही. मी लहान असतानाचे तुमचे शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत. तुम्ही सांगायचा, भूमिका कुठलीही असो, हजार टेंशन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकीटावरोबर मन भरून लाफ्टर घेऊन गेला पाहिजे".
अभिनय पुढे म्हणतो आहे," पंच बोललेल्या वाक्यात नाही तर न बोललेल्या दोन वाक्यांमधल्या टाईंमिंगवर फुटतो. अभिनय ते टाइमिंग ओळख. अभिनय प्रेक्षकांचा झाला पाहिजे तर प्रेक्षक अभिनयचे होतील. त्यावेळी या वाक्यांचा अर्थ कळत नव्हता. पण आज कळतोय. रडवणं सोपं आहे आणि हसवणं कठिण आहे. कारण डोळ्यात अश्रू परिस्थिती आणते. ते अश्रू हाताने न पुसता लाफ्टरने पुसणं म्हणजे टॅलेंट".
अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे या नावातलं लक्ष्मीकांत बेर्डे हे फक्त नाव नाही. तर ती एक जबाबदारी आहे. आज तुमच्याकडून मिळालेलं गिफ्ट आवडलं. आता मला एक रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे. एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय अख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता. या मंचाच्या माध्यमातून बाबा प्रॉमिस करतो, त्या लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा अभिनय उद्याही महाराष्ट्र लक्षात ठेवेल".
संबंधित बातम्या