Tuzech Mi Geet Gaat Aahe:

  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)   या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या मालिकेमधील स्वराज उर्फ स्वरा ही मल्हारला सत्य सांगायला जाते. पण क्षमा, विजय हे स्वराला मल्हारसोबत बोलू देत नाहीत. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये स्वरा ही विजय आणि क्षमावर चिडलेली दिसत आहे.  


प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वरा म्हणते, 'मी मल्हार गुरुंसोबत बोलणार होते.' यावर विजय म्हणतो,  'मल्हार जसा पिहूचा बाबा आहे तसा तुझा बाबा आहे, हे तू मल्हारला सांगणार आहेस का? की तुझ्या आईचं नाव वैदेही आहे, हे सांगणार मल्हारला आहेस?  निरंजन हा नोकर नाहीये, तो तुझा मामा आहे हे सांगायचंय का तुला मल्हारला?' यावर स्वरा म्हणते, 'हे सगळं तुम्हाला कसं माहित?' 






स्वराजचं नाव स्वरा आहे, हे देखील विजय आणि क्षमा  यांना माहित असते. विजय आणि क्षमा यांना  सत्य माहित आहे, हे स्वराला माहित नसते. त्यामुळे स्वरा दु:खी होते. ती म्हणते, 'मला तुमचा खूप राग आला आहे. तुम्ही मला सांगितलं नाही की, तुम्हाला सर्व माहित आहे. तुम्ही असं का केलं? तुम्हाला माझी दया आली नाही का?''


त्यानंतर विजय आणि क्षमा हे स्वराला  समजवण्याचा प्रयत्न करतात. क्षमाला स्वरा म्हणते, 'मावशी मला सगळ्यात जास्त तुझा राग आलाय' त्यानंतर क्षमा स्वराला समजवते. 






'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते. या मालिकेतील मंजुळा ही भूमिका देखील ऊर्मिला कानेटकर साकारते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'मदर्स-डे' निमित्त प्रिया मराठेनं 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा खास व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले, 'मोनिकासारखी आई असेल तर...'