Tuzech Mi Geet Gaat Aahe:

  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत ट्वीस्ट येत असतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही मल्हार आणि मोनिका यांच्या घरात पिहू आणि स्वराजला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  मंजुळा आणि स्वराज हे दोघे चोर आहेत आणि चोरी करायला ते घरात आले आहेत, असा आरोप  मोनिकानं केला आहे. आता मोनिकाचा हा आरोप मंजुळा कसा खोडून काढेल? हे प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये कळणार आहे. 


तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोच्या सुरुवातीला दिसतं की, 'मोनिका म्हणते,  'आज आई आणि पोरगं येईल समोरासमोर' त्यानंतर स्वराज हा घसरून पडतो. त्याला सावरण्यासाठी मंजुळा तिथे येते. मोनिका ही मंजुळा आणि मोनिका यांना म्हणते, 'वाटलंच मला आई आणि मुलाची ही जोडी लुटायला घुसली आहे आपल्या घरात, चोर कुठले.' मोनिकाच्या या आरोपावर मंजुळा उत्तर देते, 'तुझं टाळकं आहे का जागेवर?'


पाहा प्रोमो






काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर मंजुळाची मालिकेत एन्ट्री झाली. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते. त्यामुळे स्वराज हा मंजुळाला 'आई' म्हणत असतो.


तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा मोनिकाला देणार जशास तसे उत्तर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?