Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष; बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी


Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमामध्ये विविध कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. या बच्चे कंपनीचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना आवडत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Anupama : काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापला; मायाच्या वेडेपणाला अनुजचं सडेतोड उत्तर


Anupama Serial Latest Update : रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) यांच्या 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत दिवसेंदिवस रंजक ट्विस्ट येत आहेत. मालिकेचा आगामी भाग खूपच नाट्यमय असणार आहे. एकीकडे काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापणार आहे. तर दुसरीकडे मायाच्या वेडेपणाला अनुज सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  स्वराजने मंजुळासोबत काढला सेल्फी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाल्यानं आता मालिकेत  रंजक वळणावर आलेलं बघायला मिळत आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज हा मंजुळासोबत सेल्फी काढतो. 




Aai Kuthe Kay Karte : संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने अनिरुद्धवर चिडली संजना; 'आई कुठे काय करते'च्या प्रोमोने वेधलं लक्ष


Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने संजना अनिरुद्धवर चिडलेली दिसणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा



Hemangi Kavi : 'मन धागा धागा’ मालिकेच्या सेटवर हेमांगी कवीला झाली दुखापत; फोटो शेअर करत म्हणाली, 'दुःख, यातना, क्लेश...'


Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi)  ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. हेमांगी ही वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच हेमांगीनं एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीनं तिला झालेल्या दुखापतीबाबत सांगितलं. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा