Khupte Tithe Gupte :
खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की नारायण राणे यांचा एक व्हिडीओ संजय राऊत यांना दाखवण्यात येतो. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नारायण राणे म्हणतात, "भारतामध्ये इलेक्शन रोलमध्ये नाव नसेल तर लोकप्रतिनिधी होता येत नाही. साहेब मला म्हणाले, नारायण याला खासदार करायचंय आपल्याला, मी फक्त साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केला."
नारायण राणे यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर संजय राऊत म्हणाले, "हे खोटं बोलत आहेत. मतदार नोंदणी क्रमांक मी दिलेला आहे. या वक्तव्यामुळे त्यांची खासदारकी जाऊ शकते." संजय राऊत हे खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या मंचावर आणखी कोणत्या विषयांवर चर्चा करणार? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
पाहा प्रोमो:
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. आता संजय राऊत हे या कार्यक्रमात अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना कशी उत्तरं देतात? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 25 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा हा एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत,असंही म्हटलं जात आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या