Monika Bhadoriya On Disha Vakani Come Back : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. एकीकडे या मालिकेतील कथानक रोमॅंटिक वळणावर आलं आहे. 15 वर्षांनी टप्पू सोनूला प्रपोज करणार आहे. तर दुसरीकडे या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत या मालिकेतील बावरीने यासर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मिसेस सोधीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता मालिकेत बाबरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियानेही याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या सेटवर गैरवर्तन होत असल्याचा दावा मोनिकाने केला आहे. तसेच दयाबेनच्या कमबॅकबद्दल बोलताना मोनिका म्हणाली की,"दिशा वकानीला आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका करायची नाही. तसेच मालिकेतील इतरही कलाकारांना ही मालिका करण्याची इच्छा नाही आहे".
मोनिका म्हणाली,"तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दिशा मुख्य भूमिकेत असूनही बऱ्याच दिवसांपासून ती गायब आहे. शोच्या निर्मात्यांनी तिला परत आणण्याचा प्रयत्न केला असेल, असं मला वाटत नाही. तसेच तिचीदेखील आता या मालिकेत काम करण्याची इच्छा नाही आहे. असित मोदीने दिशासोबतही गैरवर्तन केले असावे. परंतु तिने कधीही काहीही गांभीर्याने घेतले नाही".
मोनिका पुढे म्हणाली की,"दिशा नेहमी असं म्हणायची काहीही झाले तरी सोडा, जाऊ द्या. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील बाकी कलाकार असित मोदी यांच्या विरोधात बोलत नाहीत. कारण ते निर्माते आहेत आणि त्यांच्याकडून इतरांना पैसे मिळतात. पण तरीही या मालिकेतील बऱ्याच जणांनी ही मालिका सोडली आहे. बाकीचे कलाकारही लवकरच या मालिकेतून एक्झिट घेतील".
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. दयाबेन, जेठालाल, पोपटलाल, बबिता जी, अय्यर, भिडे अशी या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या मालिकेत पुन्हा एकदा रोमॅंटिक ट्रॅक सुरू झाल्याने मालिकेचा टीआरपी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या