Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये एक ट्वीस्ट आला आहे. मोनिकाच्या घरात मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही पिहूला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. पण मंजुळानं पिहूला गाणं शिकवू नये, असं मोनिकाचं मत आहे. नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा आणि मोनिका यांच्यामध्ये वाद झाले आहेत, असं दिसत आहे.
'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मोनिकाला भेटायला आली आहे. तुमच्या मुलीला गाणं शिकवायला बाई हवी होती, त्यामुळे तुम्ही इथं बोलवलं ना? यावर मोनिका म्हणते, 'पिहूला गाणं शिकवायला टिचर हवी होती पण तू नकोयस मला' मोनिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मंजुळा मनातल्या मनात म्हणते, ए शाहणे, राहणार तर मी इथेच आणि हिरे पण मिळवणार'
मंजुळानं तिच्याकडे असणारे हिरे स्वराजच्या माऊथ ऑर्गनध्ये लपवले होते. ते हिरे आता मंजुळाला परत मिळतील का? या प्रश्नाचं उत्तर 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळेल.
पाहा प्रोमो
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये मोनिकाचा स्वराज विषयीचा राग हजारो लोकांसमोर आला. मल्हारनं सोशल मीडियावर एक लाईव्ह केलं. या लाईव्ह दरम्यान मोनिका ही स्वराजवर चिडली होती.
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे (Priya Marathe) ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: