Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील रंजक वळणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेतून अरुंधतीच गायब होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती लवकरच परदेशात जाणार असल्याचं कळत आहे. तसेच अरुंधती परदेशात जाणार असल्याने सर्व जण तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. 


अरुंधती जाणार परदेशात; नेमकं प्रकरण काय?


'आई कुठे काय करते'चे सध्याचे एपिसोड वीणाच्या पात्राभोवती फिरत आहेत. शिवाय आजच्या एपिसोडमध्ये अरुंधतीला एक गुडन्यूजही मिळणार आहे. अरुंधतीला वर्ल्ड टूरची संधी मिळाली असून, जगातील प्रतिष्ठित शहरांमध्ये प्रतिष्ठित मंचावर तिला गाण्याची संधी मिळाली आहे. अरुंधतीचा मुलगा यश तिच्यासाठी ही आनंदाची बातमी घेऊन येतो आणि संपूर्ण कुटुंब तिचे अभिनंदन करते. अरुंधतीला तातडीने या टूरसाठी निघावं लागणार असल्याने ती कसं काय सर्व सांभाळायचं या चिंतेत असते.






मिळालेल्या संधीमुळे अरुंधती भावूक झाली आहे. त्यामुळे आशुतोष तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. तो अरुंधतीला म्हणत आहे की,"लोक तुझ्यासाठी ज्या टाळ्या वाजवतील त्या मी ऐकेन अरुंधती. लोक तुझं कौतुक करतील तेव्हा मला आनंद होईल". असं म्हणत आशुतोष अरुंधतीला मिठीत घेतो. दोघांचा हा भावूक क्षण प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 


'आई कुठे काय करते' मालिकेच्या पुढच्या काही भागात अरुंधती दिसणार नाही. प्रत्यक्षात अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर लेकीबरोबर सुट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलिया ट्रिपवर गेली आहे. मधुराणीनं सध्या मालिकेतून सुट्टी घेतल्यानं मालिकेतील अरुंधती देखील विदेशात गेल्याचं दाखवण्यात येणार आहे.


'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर ठेवतेय विश्वास; पाहा 'आई कुठे काय करते !' मालिकेचा प्रोमो