मुंबई : कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माच्या "द कपिल शर्मा शो" या नवीन शोमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण चाहत्यांचा हा आनंद काही दिवसांपुरताच असेल.कारण कपिल शर्माचा नवीन शो लवकरच संपणार आहे.

 

'द कपिल शर्मा शो' फक्त 13 आठवडेच प्रसारित होणार आहे. 'द कपिल शर्मा शो' चे फक्त 26 एपिसोड प्रसारित होणार असल्याने हा कार्यक्रम 13 आठवडे सुरु राहिल. तीन महिन्यांनतर या शोबाबत निर्णय घेण्यात येईल.

 

सोनी चॅनल आणि द कपिल शर्मा शो यांच्यात सुरुवातीलाच तीन महिन्यांचा करार झाला होता. या तीन महिन्यात टीआरपी चांगला असेल तर हा कार्यक्रम सुरु ठेवायचा की काही काळासाठी सीझन ब्रेक घ्यायचा याबाबत निर्णय घेतला जाईल.

 

23 एप्रिलपासून 'द कपिल शर्मा शो'ची सुरुवात झाली. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पहिल्या एपिसोडला हजेरी लावली होती. या शोमध्ये कपिलसोबत अली अजगर, सुनील ग्रोवर, किकू शारदा, सुमोना चक्रवती, चंदन प्रभाकर आणि रोशैल राव आहेत.