मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राजच्या दाव्यानुसार, प्रत्युषाला ड्रग्ज आणि दारुचं व्यसन होतं. इतकंच नाही तर तिच्यावर बँकांचं कर्जही होतं. 'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका साकारणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल रोजी गोरेगावच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंहवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
राहुल राजच्या अंतरिम जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. मागील सुनावणीत आरोपी राहुल राजच्या अटकेवर आजपर्यंत स्थगिती देण्यात आली होती.
राहुल राजचा दावा राहुल म्हणाला की, "प्रत्युषाला ड्रग्ज आणि दारुचं व्यसन लागलं होतं. यामुळे अनेकदा ती स्वत:वरील नियंत्रण गमवून बसायची. प्रत्युषाला नशेचं व्यसन जडल्याचं तिच्या मित्र-मैत्रिणींना माहित होतं.
तसंच प्रत्युषावर कर्जाचं डोंगर होतं. त्यामुळे ती आर्थिक तणावाखाली होती. अनेक बँकांचं लोन तिच्यावर होतं, असंही राहुल राजने सांगितलं. आधी असं म्हटलं जात होतं की, मालिकेतील कामातून मिळणारे पैसे प्रत्युषाच्या आईच्या बँक अकाऊंटमध्ये जमा व्हायचे. काही वृत्तानुसार, "फॉरेन्सिक अहवालात म्हटलं आहे की, प्रत्युषाच्या शरीरात "इथाइल अल्कोहोल सापडलं आहे. मृत्यूच्यावेळी प्रत्युषाच्या शरीरात याचं प्रमाण 140 एमजी होतं."
तर डॉक्टरांच्या मते, शरीरात 30 एमजीपेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोल नसावं. त्यामुळे मृत्यू झाला त्यावेळी प्रत्युषा खूपच नशेत होती.
संबंधित बातम्या