The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात.'द कपिल शर्मा शो' च्या  एका एपिसोडमध्ये अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी हजेरी लावली आहे.  या एपिसोडमध्ये अभिनेत्री मंदाकिनीनं तिच्याबाबत पसरलेल्या अफवांबाबत सांगितलं. 


'द कपिल शर्मा शो' मध्ये मंदाकिनीनं सांगितलं की, 'माझ्या वडिलांनी मझ्यावर गोळी झाडली आहे, अशी चर्चा सुरु होती.' या अफवेबद्दलचा किस्सा सांगताना मंदाकिनी म्हणाली, 'माझ्या वडिलांनी मला गोळी मारल्याची बातमी पसरली होती. मी सेटवर पोहोचल्यावर सगळे माझ्याकडे आले. मला ते लोक विचारत होती की,  मी ठीक आहे का?  ते सर्व माझ्याबद्दल इतकी चिंता का व्यक्त करत होते? हे मला कळले नाही आणि नंतर मला ही अफवा पसरल्याचं कळलं.'


राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळे मंदाकिनीला विशेष लोकप्रियता मिळाली. या  चित्रपटासाठी मंदाकिनीला फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले. या चित्रपटातील मंदाकिनीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.






संगीता बिजलानीच्या अनेक चित्रपटांची नावे  गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे कपिलने द कपिल शर्मा शोमध्ये गमतीने सांगितले. वर्षा उसगावकर, संगीता बिजलानी आणि मंदाकिनी  यांनी अनेक किस्से द कपिल शर्मा शोमध्ये सांगितले. 


द कपिल शर्मा शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. काही सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात. काही दिवसांपूर्वी रवीना टंडन, गुनीत मोंगा आणि सुधा मुर्ती यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या तिघींनी विविध किस्से प्रेक्षकांना सांगितले.   'कपिल शर्मा शो'च्या चौथ्या सिझनमध्ये मोटिव्हेशनल स्पीकर, गायक, तसेच सेलिब्रिटींनी या सिझनमध्ये हजेरी लावली.23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.  कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. 


जून महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे, असं म्हटलं जात होतं. आता 'हा शो खरच बंद होणार आहे का?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये कपिलला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत कपिल म्हणाला, 'हे अजून निश्चित झालेले नाही. आम्हाला जुलैमध्ये टूरसाठी यूएसएला जायचे आहे आणि नंतर आम्ही याबबात विचार करु. अजून बराच वेळ आहे.'


संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर यांनी लावली हजेरी; पाहा प्रोमो