Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून आता टास्कलादेखील सुरुवात झाली आहे. या पर्वातील पहिल्या साप्ताहिक कार्याला काल सुरुवात झाली आहे. 'दे धडक - बेधडक' असं या कार्याचं नाव आहे. 


'दे धडक - बेधडक' हा टास्क टीम A विरुद्ध टीम B असा रंगणार आहे. अपूर्वा आणि प्रसाद या साप्ताहिक कार्याचे संचालक असणार आहेत. साप्ताहिक कार्याच्या पहिल्या उपकार्याला सुरुवात होताच सदस्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. बिग बॉस यांच्या आदेशानंतर देखील सदस्यांमधील ओढाताण सुरूच आहे. त्यामुळे आता या कार्यात कोणती टीम विजयी होणार आणि कोणत्या सदस्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 




टास्कसंदर्भात टीम A आणि टीम B मध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसणार आहे. अपूर्वाचे म्हणणे आहे,"मी सांगितल्याप्रमाणे फेअर संचालक असणार आहे, ते चांगले खेळले तर तसं म्हणेन". यावर अक्षय असहमती दर्शवत त्याचं मत मांडणार आहे. त्याच्यामते,"अपूर्वा त्यावर म्हणाली ते मी ठरवणार आणि पुढच्या फेरीसाठी अक्षय, मेघा आणि योगेश खेळणार. तर, दुसऱ्या टीमची देखील चर्चा सुरु आहे, प्रसादाचे म्हणणे आहे, सगळे सगळं बघतं आहे, आपण खूप फेअर आहोत.".


'बिग बॉस मराठी 4' कुठे पाहू शकता?


बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षक कलर्स मराठीवर सोम-शुक्र रात्री 10 वा. आणि शनि-रवि रात्री 9.30 वा. पाहू शकतात.


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : 'ऑल इज वेल' म्हणत 'बिग बॉस'चं दार उघडलं; स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री?


Bigg Boss Marathi 4 : 'आटली बाटली फुटली'; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य