KBC 14: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’चा (Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. शोमध्ये देशातील विविध भागातील स्पर्धक सहभागी होतात. केबीसीच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये लेफ्टनंट कर्नल गिरीश टंडन यांनी सहभाग घेतला होता. 6 लाख 20 हजार या टप्प्यांवर गिरीश टंडन हे पोहोचले होते. पण या प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकले नाही.
काय होता 6 लाख 20 हजार रुपयांसाठीचा प्रश्न?
लेफ्टनंट कर्नल गिरीश टंडन यांनी 3 लाख 20 हजार ही रक्कम जिंकली. पण 6 लाख 20 हजार रुपयांच्या बक्षीसासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र गिरीश हे देऊ शकले नाही. 6 लाख 20 हजार रुपयांसाठीचा प्रश्न हा होता-
प्रश्न- 2022 मध्ये फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रॉड्रिगो दुतेर्ते यांची जागा कोणी घेतली?
पर्याय: ए- लेनी रॉब्रेडो, बी- मॅनी पॅकियाओ, सी- फर्डिनांड मार्कोस जूनियर, डी- इस्को मोरेनो.
उत्तर: लेनी रोब्रेडो
या प्रश्नाचे उत्तर देताना स्पर्धक थोडे गोंधळले. त्यांच्याकडे 'व्हिडिओ कॉल' लाईफलाईन होती. त्यांनी त्यांच्या मित्राला व्हिडिओ कॉल केला, पण त्यांच्या मित्राला योग्य उत्तर माहित नव्हते. यानंतर, स्पर्धकांनी पर्याय डी अर्थात इस्को मोरेनोचे उत्तर लॉक केले, परंतु ते चुकीचे आहे. त्यामुळे ते 6 लाख 20 हजार रुपये जिंकू शकले नाहीत.
कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती
छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनची सुरुवात 7 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सिझनमध्ये खेळाचे काही नियम बदलले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला 75 लाख मिळणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Kaun Banega Crorepati 14 : 'पुढच्या जन्मी मला पत्रकार व्हायचंय'; केबीसीच्या मंचावर बिग बींनी व्यक्त केली इच्छा
- KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'ला मिळाली पहिली करोडपती स्पर्धक; प्रोमो आऊट