Tharla Tar Mag Episode Updates : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यातीत देखील अव्वल आहे. तसेच मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावरही आली आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. त्यातच या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली सायली म्हणजेच जुई गडकरी (Jui Gadkari) हीच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा मालिकेच्या कथेबाबत बरीच चर्चा सुरु आहे. 


जुईने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच एक सत्य बाहेर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की, ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होता, अखेर सत्याचा विजय होणार. त्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. जुईच्या या पोस्टमुळे कोणाचं आणि कोणतं सत्य बाहेर येणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


मालिकेमधील कोणतं सत्य बाहेर येणार


या मालिकेची सुरुवातच अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रक्ट मॅरेजमुळे झाली आहे. याविषीय फक्त चैतन्यला माहिती आहे. सध्या अर्जुन आणि चैतन्यमध्ये वाद असल्यामुळे चैतन्य अर्जुनचं हे सत्य बाहेर काढणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसेच अर्जुनच्या वडिलांना महिपत ड्रग्ज केसमध्ये अडकवतो आणि तोच त्यांची सुटका करुन त्यांचा विश्वास कमावतो. त्यामुळे हा सगळा महिपतचाच डाव असल्याचं सायली सगळ्यांसमोर आणणार का याची देखील उत्सुकता आहे. प्रिया ही खोटी तन्वी बनून रविराज किल्लेदारच्या घरी राहत आहे. त्यामुळे किल्लेदारांना खरी तन्वी कोण आहे, हे सत्य समजणार का? असा देखील प्रश्न पडलाय. त्यामुळे या मालिकेत नेमकं कोणतं सत्य बाहेर येणार याची प्रेक्षक वाट पाहतायत. 


सायलीच्या हातचं खाण्यास पूर्णा आजीचा नकार


मालिकेत दुसरीकडे सायलीच्या हातचं खाण्यास पूर्णा आजी नकार देताना दिसून येत आहेत. कल्पना पूर्णा आजीला समजावण्याचा प्रयत्न करते. पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. कुटुंब तुटण्यास सायली जबाबदार असल्याचं पूर्णा आजीला वाटतं. त्यामुळे कल्पना पूर्णा आजीसाठी जेवन बनवते.


प्रिया पुढे-पुढे करण्याची एक संधी सोडत नाही...


'ठरलं तर मग' या मालिकेत प्रिया पुढे-पुढे करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. मालिकेच्या आजच्या भागात प्रिया लॉनमध्ये बसलेली असताना तिथे रविराज येऊन तिला सँडीबद्दल (खोटा प्रियकर) विचारतो. सँडीबद्दल विचारल्याने प्रिया घाबरते. 


ही बातमी वाचा : 


Tharala Tar Mag Latest Episode : अर्जुनला आणखी एक मोठा धक्का, सायलीच्या हातचं खाण्यास पूर्णा आजीचा नकार; 'ठरलं तर मग' मालिकेत आज काय पाहाल?