Tharla Tar Mag : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिकेने बाजी मारली आहे. मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच अनेक रंजक वळण घेत मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडत आहे. तसेच आता साक्षीमुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्या मैत्रीतही दुरावा आल्याचं पाहायला मिळतंय. 


मालिकेत नुकतचं अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाच्या जाणीव होते. ही गोष्ट त्याला सर्वात आधी चैतन्यला सांगायची असते. त्यासाठी तो चैतन्यच्या घरी जातो. त्यावेळी साक्षी आणि चैतन्यच्या नात्याचं सत्य अर्जुनसमोर येतं. अर्जुन आणि चैतन्यमध्ये या गोष्टीवरुन बरेच वाद होतात आणि अर्जुन चैतन्यच्या घरातून रागाने निघून जातो. त्यानंतर आता चैतन्य आणि अर्जुनमधील मैत्री कायमची संपणार की सायली चैतन्य समोर साक्षीचं खरं रुप आणणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 


चैतन्य देणार राजीनामा


अर्जुनला चैतन्यचं सत्य समजल्यावर दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य ऑफीसमध्ये भेटतात. तेव्हा अर्जुन चैतन्यसोबत कामाचं बोलतो. पण साक्षीचा कोणताही विषय काढत नाही. त्यावेळी चैतन्य अर्जुनसमोर त्याचा राजीनामा ठेवतो. तु कालच्या गोष्टीवर नीट विचार केला असशील आणि तुला तुझी चूक कळली असलेच, पण या गोष्टीवर आपण नंतर बोलूया, असं अर्जुन चैतन्यला सांगतो. त्यावेळी चैतन्याला पुन्हा एकदा अर्जुनच्या बोलण्याचा राग येतो. त्यावेळी सायली देखील तिथे येते. सायली चैतन्य या सगळ्यामध्ये पडू नको असं सांगतो. पण तरीही तुमच्या मैत्रीला दृष्ट लागली असल्याचं सायली म्हणते. 


चैतन्य तोडणार अर्जुनसोबतची मैत्री


चैतन्य पुन्हा एकदा अर्जुनला साक्षीचा अपमान करण्यावरुन बोलतो. साक्षीला गुन्हेगार म्हणणाऱ्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात स्थान नाही, असं म्हणत चैतन्य अर्जुनशी पुन्हा भांडतो. मी आतापर्यंत तुझ्या तालावर नाचतो होतो, पण आता साक्षीने माझे डोळे उघडले आहेत, असं म्हणत चैतन्य अर्जुनला बरंच काही ऐकवतो. अर्जुनच्या टेबलवर त्याचा राजीनामा ठेवून चैतन्य अर्जुनला आजपासून अर्जुन सुभेदार तुझ्याशी माझा संबंध संपला असं म्हणून निघून जातो. 


सायली करणार गैरसमज दूर?


चैतन्य गेल्यावर सायली अर्जुनला समजावण्यचाा प्रयत्न करते. आपण एकदा चैतन्यशी बोलूया असं सायली अर्जुनला म्हणते. पण जोपर्यंत साक्षी त्याच्यासोबत आहे तोपर्यंत चैतन्य काहीच होणार नाही. तो साक्षीचं जोपर्यंत ऐकतोय, तोपर्यंत आपल्या समजावण्याचा देखील काही उपयोग होणार नाही. त्यावेळी सगळ लवकरच ठिक होईल, असा विश्वास अर्जुनला देते. 


ही बातमी वाचा : 


Aai Kuthe Kay Karte : मालिका बंद होण्याच्या चर्चांना पूर्णविराम! पण संध्याकाळचा मेन स्लॉट नाही, 'आई कुठे काय करते' येणार 'या' वेळेत भेटीला