Tharla Tar Mag : ज्या घटनेमुळे सायली आणि अर्जुनच्या गोष्टीला सुरुवात झाली आता तिच घटना एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी अर्जुने सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मधूभाऊ निर्दोष असण्याचे पुरावे सायली आणि अर्जुन सुरुवातीपासून शोधतायत. पण आता अर्जुनला या केसमध्ये एक महत्त्वपूर्ण यश मिळणार आहे. कारण अर्जुन मधूभाऊंची जामिनावर सुटका करतो. कोर्टाच्या या निर्णयामुळे महिपत, साक्षी आणि प्रिया या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.
कोर्टात अर्जुन विलास आणि मधूभाऊंच्या केससंदर्भात कोर्टात जोरदार युक्तिवाद करतो. विलास आणि मधुभाऊ यांच्यात जर पिस्तुलीसाठी झटापट झाली तर त्यावर फक्त मधूभाऊंच्या हाताचे ठसे कसे? विलासच्या हाताचे ठसे का नाही? असा प्रश्न अर्जुन उपस्थित करतो. त्यानंतर ते ठसे पुसणारी तिसरी कोणतीतरी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती साक्षी आहे असा युक्तिवाद अर्जुन करतो.
अर्जुन मिळवून देणार मधूभाऊंना जामीन
मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात युक्तिवाद करताना अर्जुनच्या डोळ्यातही पाणी येतं. तो कोर्टाला सांगतो की,मधूभाऊ रोज पोलिसांच्या संपर्कात राहतील, हवं तर रोज पोलीस स्थानकात हजेरी देखील देतील, या गोष्टीची खात्री त्यांचा वकील म्हणून मी कोर्टाला देतो.पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधूभाऊंना जामीन मिळायलाच हवा. त्यानंतर कोर्टानेही सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे मधूभाऊंना जामीन मंजूर केला.
सायली अर्जुन साजरी करणार प्रेमाची दिवाळी
तुम्ही मधूभाऊंची केस मुद्दाम लांबणीवर टाकत होतात? तुमच्यामुळे मी मधूभाऊंना परत कधीच भेटू शकणार नाहीये. चांगली भेट दिलीत मला दिवाळीची. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके वाईट असाल. त्यानंतर अर्जुन दिवाळीच्या दिवशी मधुभाऊंनाच घेऊन घरी येतो. त्यावेळी मधूभाऊ म्हणतात की, जावईबापूंनी बेलवर सोडवून आणलं आहे मला. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की, तुम्हाला वाटतोय इतकाही वाईट नाहीये मी आणि सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते.