Bigg Boss 18: बिगबॉसच्या घरात आपल्या पर्सनल गोष्टींना हात लावला म्हणून कायमच वातावरण तापलेले दिसले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी रेशनवरून विवियन आणि चाहत यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाले होते. चाहतनं विवियनची कॉफी लपवत विवयनला छेडल्याचं दिसलं होतं. आता परत विवियनचा कॉफीवरून संताप उकळल्याचं दिसतंय. माझी कॉफी ३ आठवड्यांपासून आली नसल्याचं तो घरातल्यांना ओरडून सांगताना दिसतोय. यावर करणवीर अजून एक आठवडा सही असं म्हणत विवियनला उत्तर दिलं. एकीकडे दिग्विजयही म्हणाला कॉफी पिली नाहीस तर मरणार नाही तो.. तर कशीशनं मला फरक पडत नाही असं म्हणत बाहेर जाऊन कॉफी पी असं म्हणत विवियनशी वाद घातल्याचं दिसलं.


कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रॅम पेजवर बिगबॉसच्या घरातल्या रेशनवरून आणि विवियनच्या कॉफीवरून झालेल्या ड्रामाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.


विवियनचं कशीशशी वाजलं


एरवी छोट्या छोट्या गोष्टीवरून चाहत पांडेशी वाद घालणारा विवियन या नव्या प्रोमोमध्ये फॉर  अ चेंज कशीश कपूरशी भांडताना दिसतोय. घरातील रेशनवरून बिगबॉसच्या घरात काटछाट सुरु असल्याचं या प्रोमोमध्ये दिसतंय. त्यात घरातील बाकीच्या सदस्यांना रेशनची काळजी असल्याचं दिसलं तर विवियननं आपली कॉफी गेल्या तीन आठवड्यापासून आली नसल्याचं सांगत भांडण उकरून काढलं. माझी कॉफी कुणामुळं आली नाही असं म्हणत त्यानं कशीशशी वाद घातल्याचं दिसलं. त्यावर तुला कॉफी प्यायची असेल तर घराबाहेर जाऊन पी असं म्हणत कशीशही कडाडली होती.


करणवीर, दिग्विजयसह कशीशनंही कॉफीसाठी केला विरोध


बिगबॉसच्या घरात माझी कॉफी गेल्या ३ आठवड्यापासून आली नसल्याचं सांगताच घरातल्या सदस्यांनी विवियनला विरोध केल्याचं दिसलं. तीन आठवडे नाही आली तर अजून एक आठवडा.. असं करणवीर म्हणाला. दिग्विजय तर म्हणाला, कॉफी पिली नाहीस तर मरणार आहेस का यावर कशीशचाही पाठिंबा होता. त्यावर माझी कॉफी गेली कोणामुळे असं विवियन म्हणाला. त्यावर मला काही घेणंदेणं नसल्याचं कशीश म्हणाली. यावरून विवयन आणि कशीशचं भांडण होताना दिसलं.