Tharla Tar Mag : स्टार प्रवाह वाहिनीवरील  'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत प्रियाने पुन्हा एकदा सायली आणि अर्जुनच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला. पण सायली आणि अर्जुनने अगदी हुशारीने प्रियाचा हा डावली उलटून लावला. त्यामुळे पुन्हा एकदा घरच्यांसमोर प्रियाचा खोटेपणा उघडकीस आला आहे. अर्जुन आणि सायलीच्या खोट्या घटस्फोटाविषयी प्रियाचं कारस्थान अर्जुन रवीराज समोरच उघडं पाडतो. त्यामुळे आता रवीराज प्रियाला काय शिक्षा देणार याची उत्सुकता आहे. 


दरम्यान सायली आणि अर्जुनमध्ये मधूभाऊंच्या केसवरुन काही गैरसमज होतात. सायली अर्जुन आणि चैतन्यचं बोलणं अर्धवटच ऐकते. त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीसा तणाव निर्माण होतो. याचाच फायदा घेत तन्वी सायलीच्या नावाने अर्जुनला घटस्फोटाची नोटीस पाठवते. त्यावर प्रिया सायलीच्या खोट्या सह्या देखील करते. पण तिचा हा खोटारडेपणा अर्जुनचा लक्षात येतो. तेव्हा अर्जुन सगळ्यांसमोर पुरव्यांसहित या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतो. 


सायली आणि अर्जुनने केला प्रियाचा पर्दाफाश


सायली अर्जुनला म्हणतो की, डिवोर्स नोटीसवर केलेली सही आणि आता केलेली तू सही या दोघांमध्येही बराच फरक आहे. त्यावर प्रिया म्हणते की, बाबा जाऊ दे ना, हे दोघे घर सोडून चालले आहेत, म्हणून मामा आणि मामींना खूप त्रास होतोय..मला एकही क्षण इथे थांबायचं नाहीये. त्यावर अर्जुन तिला म्हणतो की, निघ निघ तू,पण या डिवोर्स पेपरवरील सहीचं तरी कोडं सुटू दे आधी..त्यावेळी प्रियाची चांगलीच तंतरते... 


सायलीने प्रियाच्या कानाखाली जाळ काढला


अर्जुन खोटे डिवोर्स पेपर बनवल्याचा सरळ आरोप करते. त्यावर प्रिया म्हणते की, हे सगळं खोटं आहे... तेव्हा अर्जून म्हणतो की, पुरव्यांशिवाय अर्जुन सुभेदार कधीच काही बोलत नाही. त्यानंतर ज्या वकिलांनी ही नोटीस पाठवलेली असते, त्या वकिलांसोबतंचं फोनवरचं बोलणं अर्जुन सगळ्यांना ऐकवतो. तो वकिल कबूल करतो की, तन्वी किल्लेदार माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सायली सुभेदारांच्या नावावर मला डिवोर्स नोटीस पाठवण्यावर भाग पाडलं..हे ऐकून सायली प्रियाच्या कानाखाली जाळ काढते. त्यावर सायली प्रियाला म्हणते की, तू कितीही प्रयत्न करत प्रिया आमचं नातं इतक्या सहज मोडणार नाही, साताजन्माची गाठ बांधली आहे इतक्या सहज ती सुटणार नाही.. 










ही बातमी वाचा : 


Abhishek Bachchan : 'I Want to Talk...', अभिषेक बच्चनची पोस्ट पुन्हा चर्चेत, नेमकं प्रकरण काय?