Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) मागील अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच आता अभिषेकची एक नवी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आलीये. ही पोस्ट दुसरं तिसरं काही नसून अभिषेकचा नवा सिनेमा आहे. 'आय वॉन्ट टू टॉक' (I Want to Talk...) असं या नव्या सिनेमाचं नाव आहे.
अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज केला आहे. त्याचप्रमाणे हा सिनेमा येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिषेकने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करत म्हटलं की, एक अशी व्यक्ती जी लण्यासाठी जगते, आपल्या सर्वांना माहितच असते. ही अशाच व्यक्तीची गोष्ट आहे, जो कायमच आयुष्याच्या उजळ बाजूकडेच लक्ष देतो. मग आयुष्याने त्याच्यावर कितीही गोष्टी त्याच्यावर थोपवल्या तरीही.. जी व्यक्ती बोलण्यासाठी जगते अशा व्यक्तीला टॅग करा..
सिनेमाचा ट्रेलर रिलीज
काही सिनेमे हे अॅक्शन, तंत्रज्ञान या गोष्टी घेऊन येतात, तर काही सिनेमे हे हृदयाला स्पर्शून जातात. दिग्दर्शक शूजीत सरकार याची एक शैली आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमातला प्रत्येक सीन हा थेट हृदयाशी संवाद साधतो. असा काहीसा संवाद या नव्या सिनेमातून करता येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. टीझरच्या सुरुवातीला अभिषेक बच्चन म्हणतो की, मला फक्त बोलायला आवडत नाही, तर मी जगण्यासाठी बोलतो..जगणं आणि मरणं यामध्ये मला केवळ हा एकच महत्त्वाचा फरक वाटतो..जीवंत लोकं बोलू शकतात.. मलेली लोकं बोलू शकत नाहीत..
अभिषेक बच्चन ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे, जिथे तो अर्जुनचा असाधारण प्रवास दाखवतो, जो आव्हानांचा सामना करतो आणि आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. हा चित्रपट जीवन बदलून टाकणारा धडा देण्याचे वचन देतो. त्यामुळे एक वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा असणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.