Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) आणि 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारणाऱ्या मालिकांनाही या मालिकेने मागे टाकलं आहे.


सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी


सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी म्हणजे 'ठरलं तर मग' ही मालिका आहे. 5 डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. जुई गडकरी (Jui Gadkari) आणि अमित भानुशालीसोबत (Amit Bhanushali) ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर, माधव अभ्यंकर, मीरा जगन्नाथ, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्ञानेश वाडेकर, नारायण जाधव अशी दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेत आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केलेली आहे.


'ठरलं तर मग' ही रोमॅंटिक मालिका आहे. या मालिकेत जुईने सायलीची तर अमितने अर्जुनची भूमिका साकारली आहे. सचिन गोखले या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. ठरलं तर मग ही एक प्रेम कथा आहे. प्रेम वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या परिस्थितीत घडतं हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.


अर्जुन सुभेदार साकारण्यासाठी अमित भानुशालीने घटवलं 17 किलो वजन


'ठरलं तर मग' या मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अमित भानुशालीने 17 किलो वजन घटवलं आहे. अर्जुन वकील जरी असला तरी त्याला खेळाची आणि फिटनेसची आवड आहे. मालिकेत अर्जुनचे बरेचसे सीन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ज्यात त्याचं फिटनेसविषयीचं प्रेम अधोरेखित होत आहे.


'ठरलं तर मग' महाराष्ट्राची फेव्हरेट मालिका!


ठरलं तर मालिका दर आठवड्याला टीआरपीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. या आठवड्यात 7.0 हा सर्वोच्च टीआरपी मिळवत ठरलं तर मालिकेने नंबर वनचं बिरुद कायम राखलं आहे. महाराष्ट्राच्या या नंबर वन मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात काय घडणार याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग'ने मारली बाजी; 'आई कुठे काय करते' पडली मागे