Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकताच या मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केला आहे. मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केल्याने एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव होतोय तर दुसरीकडे काही मालिकाप्रेमी मात्र मालिकेच्या कथानकावर नाराजी व्यक्त करत आहेत. आता मालिकेत प्रेक्षकांना नवा ट्विस्ट आलेला हवा आहे.
अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्या 'ठरलं तर मग' या मालिकेने नुकताच 400 भागांचा टप्पा पार केला आहे. स्टार प्रवाहवरील ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत सध्या चैतन्यने अर्जुनची साथ सोडली असून तो आता वकील रविराज किल्लेदार यांच्यासोबत काम करणार आहे. दुसरीकडे अर्जुनचे वडील प्रताप यांना पोलिसांनी ड्रग्सची तस्करी केल्याच्या आरोपाअंतर्गत अटक केली आहे. मालिकेत या गोष्टी घडत असल्या तरी कथानक खूप पुढे जात नसल्याची तक्रार प्रेक्षकांकडून होत आहे.
'ठरलं तर मग'चे प्रेक्षक नाराज
'ठरलं तर मग' या मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केला आहे. पण या मालिकेचे प्रेक्षक मात्र कथानकावरुन नाराज आहेत. 400 वा भाग चांगला झाला, मालिका आणखी रंजक करायला हवी, गेले काही दिवस मालिका खूप कंटाळवाणी वाटत आहे. आता मालिकेत नवा ट्विस्ट यायला हवा, कथानक पुढे सरकत नसल्याने मालिका पाहिला कंटाळा येतो, तोच तोच पणा आल्याने मालिका पाहायचा कंटाळा येतोय, अशा कमेंट्स करत मालिकाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
निर्माते लक्ष देणार?
मालिकाप्रेमींच्या नाराजीकडे निर्माते लक्ष देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मालिकेत मधुभाऊंची केस, सायलीचा भुतकाळ, प्रियाचं खोटं वागणं, खऱ्या तन्वीच्या आईचे मालिकेतून अचानक गायब होणे या गोष्टी पाहायला मिळत आहे. पण तरीही कथानक पुढे जात नसल्याची तक्रार मालिकाप्रेमींनी केली आहे. त्यामुळे लवकरच मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळेल.
'ठरलं तर मग' या मालिकेत अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्यासह ज्योती चांदेकर, मोनिका दबाडे, प्राजक्ता कुलकर्णी, सागर तळाशीकर, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन, प्रतीक सुरेश, केतकी पालव, मयुरी मोहिते, ज्ञानेश वाडेकर आणि चैतन्य सरदेशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या