Tejasswi Prakash : ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेली टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) केवळ तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) ‘बिग बॉस 15’पासून (Bigg Boss 15) एकमेकांना डेट करत आहेत. चाहत्यांना देखील ही जोडी खूप आवडते आहे. जेव्हाही ही जोडी एकत्र दिसते, तेव्हा सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा असते. दोघांची परफेक्ट जोडी पाहून चाहते त्यांना एकच प्रश्न विचारतायत की, ‘ही जोडी लग्न कधी करणार आहे?’. दोघांवरही सध्या याच प्रश्नांचा भडीमार होत आहे.


मात्र, आता हा प्रश्न इतक्यावेळा विचारला जात आहे की, तेजस्वी प्रकाश खूप वैतागली आहे. अखेर तिने आता या प्रश्नावर उत्तर दिले आजे. लग्नाच्या प्रश्नाला उत्तर देताना तेजस्वीने एक रील व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. यात तिने आपल्या मनातील भावनाच व्यक्त केल्या आहेत.


पाहा व्हिडीओ :



अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘मुझे नही पता है, मुझसे मत पुछो ना’ या व्हायरल गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने एक ओळ लिहित म्हटले की, ‘जेव्हा पॅप्स प्रश्न विचारतात- तुझे लग्न कधी होणार आहे?'  इतकंच नाही तर, तिने कमेंट विभागात करण कुंद्राला टॅग केले आणि लिहिले की, ‘सनीला विचारा... त्याला माहित आहे.’


कधी लग्नबंधनात अडकणार ‘ही’ जोडी?


एका मुलाखतीत जेव्हा अभिनेत्रीला करणसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तेजस्वी म्हणाली की, ‘आम्ही दोघे आता काम करत आहोत. सध्या दोघेही व्यस्त आहोत. लग्न कधी करणार, नेहमीप्रमाणे हा निर्णय देखील मला करणवर सोडायचा आहे. तेव्हा, लग्नाची चौकशी करण्यासाठी करणशी संपर्क साधा.’


कामात व्यस्त करण अन् तेजस्वी


तेजस्वीने गंमतीत जरी या प्रश्नाचे उत्तर दिले असले, तरी ही जोडी अनेकदा त्यांच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल बोलत असते. सध्या तेजस्वी आणि करण दोघेही अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ‘बिग बॉस15’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी सध्या 'नागिन 6' मध्ये मुख्य भूमिकेत झळकत आहे. याशिवाय तिच्याकडे बॉलिवूडच्या काही स्क्रिप्ट्सही आहेत. तर, लवकरच ती एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे, करण कुंद्रा देखील काही शो होस्ट करत आहे. दोघांनीही सध्या आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे त्यांनी अद्याप लग्नाची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.


हेही वाचा :


PHOTO: तेजस्वी प्रकाशच्या स्टाईलने चाहते घायाळ; साडीतही दिसते झकास!


'मन कस्तुरी रे' मध्ये दिसणार अभिनय-तेजस्वीची केमिस्ट्री; नवं पोस्टर रिलीज