Tarak Mehta Ka Ulta Chashma : "तारक मेहता का उल्टा चश्मा" मालिकेतील लोकप्रिय पात्र साकरणाऱ्या नट्टू काकांचे वयाच्या 67 वर्षी निधन झाले आहे. नट्टू काका घशाच्या कॅन्सरने पीडित होते. मागील वर्षी त्यांचे त्यासाठी ऑपरेशनदेखील झाले होते. पण त्यांना कॅन्सरच्या आजारातून बाहेर यश आले नाही. त्यांचे मुंबईतल्या मालाडमधील एका रुग्णालयात निधन झाले. 


नट्टू काका राहायला मालाडमध्येच होते. "तारक मेहता का उल्टा चश्मा" मालिकेतील लोकप्रिय नट्टू काकांचे पात्रदेखील प्रचंड लोकप्रिय होते. "तारक मेहता का उल्टा चश्मा" मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एबीपी न्यूजसोबत संवाद साधताना नट्टू काका गेल्याची माहिती दिली आहे. 


मालिकेचे निर्माते म्हणाले, "घनश्याम जी म्हणजेच नट्टू काका तुमच्या माझ्या सोबत 2001 सालापासून आहेत. त्यांचे आणि माझे नाते खूपच खास होते. आमचे कौटुंबिक संबंधदेखील चांगले आहेत. ते फक्त मला आर्शीवाद देत नसून मालिकेच्या संपूर्ण यूनिटलाही द्यायचे. आम्ही नेहमी हसतखेळत काम करायचो. ते खूपच प्रेमळ आणि सरळ मार्गाचा अवलंब करणारे व्यक्ति होते. आम्हा सर्वांनाच आता त्यांची आठवण येणार आहे ". असित मोदीने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, "घनश्याम नायक जीने सेटवर आमच्या सोबत शेवटचे 3-4 महिने आधी काम केले होते. त्यांची तब्येत खालावत असल्याने त्यांनी शूटिंग करणे टाळले होते".


तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेली 13 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना नेहमीच जवळचे वाटत असते. भिडे, जेठालाल, दयाबेन, नट्टू काका, अब्लूल, बावरी असे अनेक छोटे मोठे पात्र प्रेक्षकांना कायम आवडत राहिल.