Bigg Boss Marathi 3 : कालपासून बिग बॉस मराठीच्या घरात विकेन्डचा डाव रंगत आहे. यात मांजरेकर स्पर्धकांना चांगलाच धडा शिकवत आहे. गेला आठवड्याभर स्पर्धकांनी केलेल्या चुकांसाठी मांजरेकर स्पर्धकांना चांगलेच सुनावत आहेत. तर दुसरीकडे स्पर्धकांनी टास्कमध्ये केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे स्पर्धकांचे कौतुक करत आहेत. गेल्या आठवड्यात सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन असलेल्या दादूसची जागा या आठवड्यात मीनलने घेतली आहे. मांजरेकर मीरा, सुरेखा, गायत्री अशा काही स्पर्धकांना ओरडताना दिसत असले तरी मीनल सारख्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक करत आहेत.
बिग बॉसचा आजचा एपिसोड देखील चांगलाच रंगणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमधून ते दिसून येत आहे. पहिल्या प्रोमोतून आज बिग बॉसच्या घरात "एकच फाईट वातावरण टाईट" हा टास्क होणार असल्याचे दिसून येते आहे. हा टास्क स्पर्धकांना मांजरेकर देणार आहेत. प्रोमोत स्पर्धकांना मांजरेकर म्हणत आहेत, की मी तुम्हाला एक टास्क देतो "एकच फाईट वातावरण टाईट". यात स्पर्धकांनी बॉक्सिंग क्लोज घातले आहेत. त्यांच्या समोर घरातील सदस्यांचे फोटो आहेत. त्यातील त्यांना हव्या असलेल्या सदस्याचा फोटो घेऊन त्याला बॉक्सिंगचे पंच द्यायचे आहेत.
यात अक्षय विशालला म्हणतो आहे, विशाल स्वत:च्या डोक्याने खेळायला शिक.. तु सुरसुरी आहेस.. वाजते आणि परत विझते. तर गायत्री विकासला म्हणताना दिसते, विकास स्टॉप यूजिंग वूमनकार्ड हा शब्द.. कारण कोणी इथे वूमनकार्ड पुढे करत नाही. दुसऱ्या प्रोमोमध्ये मांजरेकर स्पर्धकांना म्हणत आहेत, तुमच्या समोर जी ब्रिफ केस आहे त्या बॅगमध्ये पाच लाख रूपये आहेत. ती तुमच्यातीच एकाने घ्या आणि हे घर सोडून जा.
कालच्या भागात महेश मांजरेकर सुरेखाला म्हणत आहेत, "सुरेखा कुडची तु... इकुडची की तिकुडची" असं म्हणत सुरेखाची मांजरेकरांनी बोलतीच बंद केली आहे. त्यानंतर मांजरेकर उत्कर्षला सुनावताना दिसून आले. उत्कर्ष समुद्रात पोहायला गेल्याचा त्रास झाला तुला कधी? त्यावर उत्कर्ष म्हणतो, "सर ते मिठाचं पाणी होतं." त्यावर मांजरेकर म्हणाले, "मिठाचं पाणी काही प्रॉब्लेम नव्हता. मिरचीची धुरी चालते ना तिथे.. डिड यू स्टॉप इट.. यू आर द मोस्ट पार्शिअल संचालक."