Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dilip Joshi : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तारक मेहतामधील दया आणि जेठालाल या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी हे साकरतात. दिलीप यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. सध्या दिलीप जोशी यांचा एका आलिशान गाडीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


दिलीप जोशी यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ब्लॅक कलरची Kia Sonet  सबकॉम्पॅक्ट SUV ही गाडी दिसत आहे. या गाडीची किंमत 12.29 लाख रूपयांपासून सुरू होते. दिलीप यांनी दिवाळीला  ही गाडी घेतली आहे. या सबकॉम्पॅक्ट SUV गाडीमध्ये काही नवे फिचर्स आहेत. सोशल मीडियावरील दिलीप यांच्या फोटोमध्ये त्यांचे कुंटुंब देखील दिसत आहे.  






Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेच्या सेटचं रहस्य, गोकुलधाम सोसायटीचे दोन भाग, काय आहे प्रकरण?


पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबतचे फोटो दिलीप सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. मालिकेमधील द्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसोबतच्या दिलीप यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी सांगितले होते की, 'मला रोज अनेक लोक विचारत होते की दिशा माझी पत्नी आहे का?  मी त्यांना सांगतो की जयमाला ही माझी पत्नी आहे.' 28 जुलै 2008  रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


TMKOC Actor Jethalal Salary : जेठालालला मिळतं 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका भागाचं एवढं मानधन; किंमत ऐकून व्हाल थक्क