मुंबई: लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सुंदरलालचे पात्र साकारणाऱ्या मयूर वकानीला कोरोनाची लागण झालेली आहे. मयूर वकानीला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच मालिकेच्या टीममध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या टीममधील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे इतरांनाही आपल्या कोरोनाची लागण झाली नसेल ना याची भीती वाटू लागली आहे. 


टीममधील सदस्यांना कोरोना टेस्ट करावी लागणार


मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या दयाबेनचा भाऊ सुंदरलाल (मयूर वाकनी) याचा स्क्रीन स्पेसचा वेळ खूप कमी असूनही त्याने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळी जागा निर्माण केली आहे. प्रेक्षकांना जेठालाल आणि सुंदरलाल यांची केमिस्ट्री खूप आवडते. परंतु सुंदरलाल कोरोना बाधित झाल्यानंतर संपूर्ण टीम तणावात असल्याचं सांगितलं जातंय. नुकतेच मालिकेतील सर्व सदस्यांसोबत सुंदरलालचं शूट झालं होतं. 


मयूर अहमदाबादमधील रूग्णालयात दाखल  


सुंदरलालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अहमदाबादमधील एसव्हीपी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता मालिकेतील कोणत्या कलाकाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर शूटिंग पुढे सुरू ठेवणे कठीण होईल. त्यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मामधील कलाकारांना योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.