Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dilip Joshi : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तारक मेहता मालिकेमधील जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) हे साकारतात. दिलीप यांचा चाहता वर्ग मोठा आहे.  दिलीप जोशी यांना जेठालाल ही भूमिका ऑफर होण्याआधी राजपाल यादव (Rajpal Yadav),  एहसान कुरैशी (Ehsaan Qureshi), कीकू शारदा (Kiku Sharda)  या कलाकारांनी ही भूमिका करण्यास नकार दिली होता. 


एहसान कुरैशी (Ehsaan Qureshi)
स्टेंडअप कॉमेडियन एहसान कुरैशी यांना जेठालाल ही भूमिका मालिकेचे दिग्दर्शक असित मोदी यांना ऑफर केली होती. पण त्यांनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला. 


कीकू शारदा (Kiku Sharda)
'द कपिल शर्मा शो'मधून विशेष लोकप्रियता मिळवणारा अभिनेता किकू शारदाला देखील जेठालाल या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती. पण किकूला एकाच भूमिकेत अडकायचे नव्हते म्हणून त्याने या मालिकेत काम करण्यास नकार दिला. 


राजपाल यादव (Rajpal Yadav)
जेठालाल या भूमिकेसाठी राजपाल यादव यांचा विचार करण्यात आला होता. पण राजपाल यांनी देखील मालिकेला नकार दिला.  


28 जुलै 2008  रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


हे ही वाचा :


Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री


Ranveer Singh in 83 Movie: 6 महिने दिवसरात्र मेहनत, तासन् तास मैदानावर सराव; कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरची अशी तयारी