Maharashtrachi Hasyajatra Chala Hawa yeu Dya Actors Fees : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) आणि 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu Dya) हे दोन्ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहेत. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच या कार्यक्रमातील विनोदवीरांना एका भागासाठी किती मानधन मिळतं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugade), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) हे विनोदवीर घराघरांत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे विनोदवीर चांगलीच कमाई करतात.
'चला हवा येऊ द्या'मधील कलाकारांचं मानधन किती? (Chala Hawa yeu Dya Actors Fees)
मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी श्रेया बुगडे एका भागासाठी 80 हजार रुपये मानधन घेते. तर पोस्टमन बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सागर कारंडे 70 हजार रुपये मानधन घेत असे. विनोदाचं अचूक टायमिंग असलेला भाऊ कदम एका भागासाठी 80 हजार घेतो. तर भारत गणेशपुरेला एका भागाचे 75 हजार रुपये मिळतात. तर कुशल बद्रिके एका भागासाठी 70-80 हजार रुपये आकारतो. एकंदरीतच भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेपेक्षा श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील कलाकारांचं मानधन किती? (Maharashtrachi Hasyajatra Actors Fees)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार एका भागासाठी किती रुपये आकारतात हे जाणून घेण्याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर कल्याणची शिवाली परब एका भागासाठी 35 ते 37 हजार रुपये घेते. तसेत रसिका वेंगुर्लेकर एका भागासाठी 25 ते 30 हजार मानधन घेते. तर न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेली वनिता खरात एका भागासाठी 32 ते 25 हजार रुपये मानधन घेते. नम्रता संभेरावलाही एका भागाचे 30 ते 37 हजार देण्यात येतात. तर समीर चौघुले एका भागासाठी 40-50 हजार मानधन घेतो.
संबंधित बातम्या