Tarak Mehta Ka Ooltah Chashma :  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि आत्माराम भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेतील माधवी भिडे ही भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशी (Sonalika Joshi) या साकारतात. गेली 13 वर्ष त्या या मालिकेत काम करत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या संपत्तीबाबत...
 
सोनालिका या डिझायनिंग बिझनेस सांभाळतात. त्यांचा मुंबईमध्ये 3 BHK फ्लॅट आहे. हा फ्लॅट घेण्याआधी सोनालिका या बोरीवली येथे 1 BHK फ्लॅटमध्ये  राहात होत्या. सोनालिका यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे जवळपास 18 लाख किंमत असणारी  MG Hector ही गाडी आहे. तसेच  Swanky Maruti आणि टोयोटा इटियॉस ही गाडी देखील त्यांच्याकडे आहे. 


सोनालिका यांनी 5 एप्रिल 2004 रोजी समीर जोशी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सोनालिका आणि समीर यांना आर्या नावाची मुलगी आहे. सोनालिका वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. 





28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी देखाल मालिका सोडली.


हे ही वाचा :


Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'या' कलाकारांनी नाकारालेली 'जेठालाल'ची भूमिका!