Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेमध्ये नुकतीच एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. पण या पाहुण्यामुळे जेठालाल आणि भिडे यांच्यामध्ये भांडण झालं आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये पोम-पोम नावाच्या नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे.  पोम-पोम ही एक मांजर आहे. या मांजरीला मालिकेमधील गोलीनं गोकुलधाम सोसायटीमध्ये आणलं आहे.  टप्पू सेनानं या पोम-पोमला गोकुलधामधील क्लब हाऊसमध्ये ठेवले. पण या मांजरीनं गोकुलधाम सोसायटीमध्ये धुमाकूळ घातला आहे. आत्माराम भिडेच्या सखाराम या स्कूटरचे सिट या मांजरीनं तिच्या नखांनी खराब केले. त्यामुळे जेठालाल आणि भिडेमध्ये भांडण झाले. आता पोम-पोमला गोकूलधाम सोसायटीमध्ये रहायला जागा मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 



 28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.   या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.


महत्वाच्या बातम्या


Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग


House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड


Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha