Swayamvar Mika Di Vohti: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंहचा (Mika Singh) ‘स्वयंवर: मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा शो टीव्हीवर प्रसारित झाला, तेव्हापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मिका सिंहसोबतच आता त्याच्या चाहत्यांनाही गायकाच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. आता लवकरच मिकाला त्याची आयुष्यभराची जोडीदार मिळणार आहे. मिकाच्या स्वयंवरात एकूण 12 तरुणी सहभागी झाल्या होत्या, ज्यातील काही आता एलिमिनेशनमध्ये बाहेर पडल्या आहेत. मात्र, नुकताच आता या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यात मिका चक्क रोमँटिक होताना दिसला आहे.


दरम्यान, मिका आणि बुशराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बुशराचे कौतुक करताना थकत नाहीय. मिका बुशराला सांगतो की, ती हॉट आणि स्वीट देखील आहे. मिका म्हणतो की, बुशरा तू खूप सुंदर आहेस. मला तुझ्यात एक लहान मूल दिसत आहे. तू खूप सुंदर आहेस. तुझे डोळे खूप छान आहेत. मात्र, त्याचवेळी दिव्यांका बजर वाजवून वेळ संपल्याचे सांगते.


पाहा व्हिडीओ :



वेळ कमी पडला!


यानंतर बुशरा तिचा अनुभव सांगताना म्हणाली की, ‘वेळ कमी होता. आम्ही दोघं एकमेकांमध्ये खूप गुंतलो होतो. अजून थोडा वेळ मिळाला असता, तर बरे झाले असते.’ मिका सिंह सध्या त्याच्या स्वयंवरमुळे खूप चर्चेत आहे. 'स्वयंवर मिका दी वोटी' या टीव्ही शोमध्ये मिकाची लाईफ पार्टनर बनण्यासाठी अनेक सुंदर मुलींमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मिका सिंहच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.


12 मुलींमधून मिका करणार एकीची निवड


‘स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची जोडीदार म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.


हेही वाचा:


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहच्या स्वयंवरमध्ये मराठी विनोदवीरांच्या मुलीचा सहभाग; ध्वनी पवार बाजी मारणार का?


Swayamvar Mika Di Vohti : घोड्यावर बसून आलेल्या मिका सिंहने जिंकलं तरुणीचं मन, ‘गब्बर’ बनून केलं मनोरंजन!