बिग बॉसमध्ये (Bigg Boss) एन्ट्री आणि बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसणारी सनी लिओनी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) दिसली आहे. या शोमध्ये ती पती डॅनियलसह आली होती. आणि यावेळी अनेक सवाल-जवाब झाले. यात मजेमजेत असे काहीतरी घडले की डॅनियलने त्याचा शर्ट उतरवून टॅटूसुद्धा दाखवला. त्याचवेळी जेव्हा सनीला विचारले गेले की तिला सर्वात जास्त कोण आवडतं? तिने काही उत्तरं द्यायच्या आधीच प्रेक्षकांनी कपिल म्हणून ओरडण्यास सुरूवात केली. त्यानंतर सनीने कपिलचे नाव घेत तो खूप आवडत असल्याचे सांगितले.

Continues below advertisement


डॅनियलच्या शरीरावर बरेच टॅटू
सनीचा पती डॅनियलला टॅटू खूप आवडतात म्हणूनच त्याने आपल्या शरीरावर बरेच टॅटू बनवले आहेत. कपिलच्या शोमध्ये त्याच्या टॅटूविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा प्रेक्षकांनी डॅनियलला त्याचा शर्ट काढून त्याला टॅटू दाखवा अशी मागणी करायला सुरुवात केली. अखेरीस डॅनियलने आपले जाकीट काढून त्याचे टॅटू दाखवले. याशिवाय सनी आणि डॅनियल यांनी त्यांच्या पहिल्या भेटीपासून प्रपोज करण्यापर्यंत या दोघांची कहाणी शेअर केली.



डॅनियल एक अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि व्यावसायिक आहे. या दोघांनीही लग्नानंतर 2017 मध्ये महाराष्ट्रातील लातूर येथून एका मुलीला दत्तक घेतले होते. 2018 मध्ये, सरोगसीद्वारे सनी 2 मुलांची आई बनली. आता ती सुखी आयुष्य जगत आहे. आणि अमेरिकेतही त्यांचे एक घर आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सनी कुटुंबासमवेत तिथे पोचते.


सनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव
सनी लिओनी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. ती बर्‍याचदा अशी काही छायाचित्रे पोस्ट करते, ज्यामुळे ती चर्चेत राहते. अलीकडेच तिने जेसीबी वर चढून एक चित्र क्लिक केले होते जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि या चित्राने लोकांचे लक्ष वेधून घेतले. नवीन वर्षाच्या निमित्ताने ती बिग बॉस 14 मध्येही पोहोचली, ते पण डॉक्टर बनून.