मुंबई : सोशल मीडियाच्या वर्तुळात प्रत्येत गोष्ट अगदी वेगानं घडत असते. सातत्यानं नवनवे अपडेट्स येत असता. सोशल मीडिया म्हटलं की, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशी काही नावं सर्रास आपल्या डोळ्यांसमोर येतात. यापैकी ट्विटरच्या माध्यमातून अनेक घडामोडींचे अपडेट आणि महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण केली जाते. अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, संस्थांचे ट्विटर हँडल फॉलो करणाऱ्यांची संख्याही जास्तच. अशाच काही फॉलोअर्सना नुकतंच राष्ट्रीय शेअर बाजार, अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर अशी बाब आढळून आली, की लगेचच त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.


झालं असं की, सहसा निफ्टी, शेअर बाजाराताल आकडेवारी, शेअर्स, नफा, तोटा अशा पोस्ट असणाऱ्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अकाऊंटवरुन थेट अभिनेत्री मौनी रॉय हिचे फोटो पोस्ट करण्यात आले. नेटकऱ्यांनी ही गोष्ट लगेचच हेरली आणि त्यावर प्रश्नही उपस्थित केले. काहींनी हे अकाऊंट हॅक झाल्याची शक्यताही वर्तवली.


ट्विटर अकाऊंटवरुन झालेल्या या पोस्टची माहिती मिळताच तातडीन या अकाऊंटवरुन एक स्पष्टीकरण देण्यात आलं. NSE च्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेली ही पोस्ट एक मानवी चूक होती, असं सांगत अकाऊंट हॅक न झाल्याचं सांगण्यात आलं. शिवाय फॉलोअर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल एनएसईच्या वतीनं दिलगिरीही व्यक्त करण्यात आली.


IND Vs AUS | वर्णद्वेषी टीका प्रकरणी सचिन संतापला, म्हणतो....


इथं झाल्या प्रकाराबद्दल अधिकृत अकाऊंटवरुन दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली असली तरीही याचे स्क्रीनशॉट्स सध्या व्हायरल करण्यात येत आहेत. शिवाय अनेकांनी एनएसईची खिल्लीही उडवण्या सुरुवात केली आहे. आता या साऱ्या प्रकारावर खुद्द मौनी रॉय काय प्रतिक्रिया देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.





सहसा सोशल मीडियावर एखादी पोस्ट करतेवेळी किंवा एखाद्या चॅटवर अनुक एक गोष्ट पाठवतेवेळी ती चुकीच्याच ठिकाणी पोस्ट झाल्याची घटना घडते. पण, एनएसईच्या अकाऊंटवर पोस्ट करण्याची जबाबदारी असणाऱ्या एजन्सीकडून अथवा अशा अधिकृत अकाऊंटवरुन झालेली ही चूक मात्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.