Zee Marathi Maha Episodes : झी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये, म्हणून येत्या रविवारी 'मन झालं बाजींद' आणि 'तू तेव्हा तशी' या लोकप्रिय मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग झी मराठीवर सादर होणार आहेत. या दोन्ही मालिका आता विलक्षण वळणावर आल्या आहेत.


राया कृष्णाला वाचवू शकेल का?


‘मन झालं बाजींद’मध्ये प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की, राया कृष्णासाठी विधिलिखिताशी लढतोय. कृष्णाला राया विधात्यांच्या घरी थाटामाटात आणण्याचं सांगतो आणि त्याच्या तयारीला लागतो. तर दुसरीकडे अंतरा, घुली मावशी आणि रितिक कृष्णाला जीवे मारण्याचा कट रचत आहेत. त्या कटानुसार कृष्णा घराबाहेर पडताक्षणी, तिचं अपहरण करून तिला एका निर्मनुष्य ठिकाणी ठेवण्यात येतं. रायाला या गोष्टीचा सुगावा लागताच तो तिला वाचवण्यासाठी लगबग करतो. राया विधिलिखिताशी लढून कृष्णाचं प्रेम जिंकू शकेल का? राया कृष्णाला वाचवू शकेल का?



अनामिका-वल्ली समोरासमोर आल्यावर काय होणार?


स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. एक तासाच्या विशेष भागात प्रेक्षक पाहू शकतील की, सौरभ राहत असलेल्या वाड्यात रामनवमी निमित्त उत्सव असणार आहे, ज्यासाठी अनामिकाला देखील आमंत्रण दिलं गेलंय. मावशी सतत सौरभच्या लग्नाचा विषय काढत असल्यामुळे वल्लीला टेन्शन आलं आहे. आता ती शक्कल लढवते आणि सौरभने लग्न केलं तर, वाड्यावरचा हक्क तो सोडून देईल, असे कागदपत्र बनवून त्यावर सौरभची सही घेते. दुसरीकडे अनामिकाला सौरभची मंडळी म्हणजे त्याची बायको असा गैरसमज झाला आहे. आजपर्यंत वल्ली आणि अनामिकाची भांडणं प्रेक्षकांनी पाहिली आहेत. पण, सौरभच्या घरी आल्यावर वल्लीला पाहून अनामिकाची काय प्रतिक्रिया असेल, हे प्रेक्षकांना या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.



हेही वाचा :