Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता पुन्हा एकदा गौरीला जीवे मारण्याचा प्रयत्न होणार आहे. या आधी खोट्या जयदीप आणि मानसीने मिळून गौरीला एका डोंगरावरून ढकलून दिले होते. या जीवघेण्या हल्ल्यातून वाचलेली गौरी एका जंगलात जखमी होऊन पडते. यानंतर ती बरी होऊन पुन्हा एकदा शिर्के-पाटलांच्या घरात प्रवेश करते.


सगळं काही सुरळीत सुरु असताना शिर्के-पाटलांच्या घरात नंदिनी अर्थात ‘माई’साहेबांची मैत्रीण आणि तिची मुलगी मानसी येतात. मानसीला जयदीपशी लग्न करायचे असते. मात्र, जयदीपचे लग्न आधीच झालेय हे बघून तिचा संताप अनावर होतो. जयदीप आणि गौरीला वेगळं करण्यासाठी ती गौरीशी मैत्रीचं नाटक करते. यात तिला तिचा बॉयफ्रेंड अनिल आणि शालिनी साथ मिळते. तिघेही मिळून गौरीला मारण्याचा कट रचतात.


गौरीला मारण्याचा कट


मानसीचा प्रियकर अनिल हा जयदीपचा मुखवटा परिधान करून गौरीला डोंगरावरून ढकलतो. या हल्ल्यातून बचावलेल्या गौरीला वाटते की, जयदीपनेच तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. स्मृतिभ्रंश झाल्याचं नाटकं करून गौरी पुन्हा शिर्के-पाटलांच्या घरात येते. यावेळी ती या तिघांना धडा शिकवण्याचा चंग बांधते. यात माई तिला साथ देतात. सगळं सुरु असतानाच जयदीपने आपल्याशी लग्न करावं, यासाठी त्याचं मुलं आपल्या पोटात असल्याचं मानसी सगळ्यांना सांगते. यामुळे जयदीप जबरदस्ती या लग्नाला तयार होतो. मात्र गौरी आपणच खरी गौरी असल्याचे सांगितल्यानंतर मानसीचा डाव फसतो. यामुळे ती पुन्हा एकदा गौरीला मारण्याची योजना आखते.


गौरी वाचवणार मानसीचा जीव


मानसी पुन्हा एकदा गौरीशी गोड बोलून तिला डोंगरावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न करते. मात्र, या प्रयत्नात ती स्वतःच फसते. गौरीला धक्का देत असताना मानसीचा टोला जातो आणि ती खाली पडते. पण, प्रसंगावधान राखून गौरी तिचा हात पकडते. यावेळी गौरी तिला ‘जयदीपने मला का ढकललं?’ असा प्रश्न करते. तर, तुला जयदीपने धक्का दिलेला नाही, याची कबुली मानसी गौरीला देते. गौरी मानसीला वाचवते. याबदल्यात मानसी देखील गौरीला या सगळ्यामागचं खरं सत्य सांगणार आहे. आता, खोट्या जयदीपचं सत्य समोर आल्यावर शिर्के-पाटलांच्या घरात काय नवा हंगामा होणार, याची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना लागली आहे.   



हेही वाचा: