Ankita Lokhande, Vicky Jain : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांनी ‘स्टार प्लस’ रिअॅलिटी शोमध्ये ‘स्मार्ट जोडी’चा (Smart Jodi) किताब पटकावला आहे. या जोडीने अंतिम फेरीत बलराज-दीप्ती आणि नेहा स्वामी-अर्जुन बिजलानी यांचा पराभव करून या रिअॅलिटी शोची ट्रॉफी जिंकली. काल रात्री स्मार्ट जोडीचा महाअंतिम सोहळा स्टार प्लसवर ऑन एअर झाला. यानंतर आता अंकिता आणि विकिवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.


अंकिता लोखंडेने रविवारी रात्री इंस्टाग्रामवर स्मार्ट जोडीच्या फिनालेची झलक शेअर केली आहे. यासोबतच तिने भरभरून प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अंकिता लोखंडेने तिचा नवरा विकी जैन याच्यासाठी एक क्यूट मेसेजही लिहिला आहे. अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडिया असो किंवा कोणतेही प्लॅटफॉर्म, ती नेहमीच आपल्या पतीचे कौतुक करताना दिसते.



पतीचे मानले आभार!


दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्न केले होते. अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'स्मार्ट जोडी'च्या फायनल दरम्यान एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणते की, ‘मी त्याच्यासोबत असल्यापासून मी एक वेगळी व्यक्ती बनले आहे. त्याने माझ्यात स्थैर्य आणले आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी तुझी खूप खूप आभारी आहे.’


पाहा व्हिडीओ :



अंकिता-विकीला ‘स्मार्ट जोडी’ची ट्रॉफी तसेच, 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. अंकिता-विकी व्यतिरिक्त, बलराज-दीप्ती आणि भाग्यश्री-हिमालय दासानी यांनी या शोमध्ये टॉप 3मध्ये आपले स्थान निर्माण केले होते. या शोची ट्रॉफी अंकिता लोखंडेच जिंकेल, असा अंदाज या शोच्या सुरुवातीपासूनच अनेकांनी लावला होता.


हेही वाचा: