TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; शाहरुख खानला कोरोनाची लागण


देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला  कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


करण जोहरची बर्थडे पार्टी कोविड स्प्रेडर? 50 ते 55 जणांना कोरोना संसर्ग


प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा काही दिवसांपूर्वी 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.  यशराज स्टुडिओमध्ये ही पार्टी पार पडली. पण करणच्या वाढदिवसाची ही पार्टी कोविडची सुपर स्प्रेडर पार्टी ठरत आहे का? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे कारण या पार्टीत आलेल्या 50 ते 55 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या पार्टीमध्ये उपस्थित होते. बॉलिवूडमधील कलाकार कोरोना संसर्ग लपवत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. 


मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ्फ-2022’ची सांगता


मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या ‘मिफ्फ-2022’ या माहितीपट,लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते.


कमल हासनच्या 'विक्रम'ने केली रेकॉर्डब्रेक कमाई


कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता. 


Get Well Soon शाहरुख; ममता बॅनर्जींनी ट्वीट करत किंग खानसाठी केली प्रार्थना


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत शाहरुख लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. याआधी पठाण सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखला कोरोनाची लागण झाली होती. 


बॉक्स ऑफिसवर 'मेजर' चित्रपटाची संथ सुरूवात


 दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार महेश बाबूच्या  प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या मेजर या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक हे NSG कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे तर हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं संथ गतीनं सुरुवात केली आहे.


केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' सोमवारी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


 गायक केके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केके यांनी गायलेलं शेवटचं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग रविवारी झाले होते. केके यांचं शेवटचं गाणं ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


'अन्य'चा ट्रेलर आऊट; तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा 10 जूनला होणार प्रदर्शित


 'अन्य' (Anya) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा सिनेमा मराठीसह हिंदीतदेखील प्रदर्शित होणार आहे. आगामी बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या यादीतील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अन्य' सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 10 जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


17 वर्षांची असताना झालं होतं लैंगिक शोषण; अभिनेत्री कुब्रा सैतचा गौप्यस्फोट


सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर मतं ती सोशल मीडियावर मांडत असते. तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील कुब्रा सोशल मीडियावर शेअर करते. कुब्रानं लिहिलेल्या ओपन बुक या पुस्तकामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देण्यात आली आहे. कुब्रानं पुस्तकामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची माहिती दिली आहे. कुब्राने पुस्तकात लिहिलं आहे की, या गोष्टीबद्दल तिनं काही वर्षांनी आपल्या आईला सांगितले.


एका चुकीमुळे आयन मुखर्जीला पुन्हा एकदा पोस्ट करावा लागला ‘ब्रह्मास्त्र’चा टीझर, पाहा नेमकं काय झालं...


 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra) पहिला टीझर ऑनलाईन रिलीज झाल्यानंतर जवळपास चार दिवसांनी दिग्दर्शक अयान मुखर्जीने (Ayan Mukerji ) सोशल मीडियावर आणखी एक टीझर शेअर केला आहे. नवीन टीझर आधीच्या टीझरसारखा दिसत असला, तरी त्यात एक छोटासा बदल करण्यात आला आहे, जो शेवटी चाहत्यांच्या लक्षात आला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिय भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.