मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुला पहाते रे' मालिकेत आता अभिनेता सुबोध भावेंच्या मुलाची एन्ट्री झाली आहे. सुबोध भावेंचा मुलगा मल्हार हा छोट्या जयदीपच्या भूमिकेत दिसणार आहे.
अनेक अनपेक्षित वळणांमुळे गाजणारी 'तुला पहाते रे' आता आणखी एक वळण घेत आहे. गेले काही दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते त्या राजनंदिनीने अखेर मालिकेत प्रवेश केला आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर राजनंदिनीची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
मंगळवारच्या भागात राजनंदिनीची शानदार एन्ट्री झाली. तिच्यासोबत छोटा जयदीपही दिसला. लहानपणीचा हा जयदीप दुसरा-तिसरा कोणी नसून सुबोध भावेंचा मुलगा मल्हार आहे.
तुला पाहते रेमध्ये सध्या फ्लॅशबॅकच्या माध्यमातून जुना काळ दाखवला जात आहे. त्यामुळे विक्रांत सरंजामे आणि राजनंदिनीची नेमकी कथा काय आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
इशा आणि विक्रांत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता राजनंदिनीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची कशी पसंती मिळते, हे येत्या काही दिवसात समजेल.
काही दिवसांपूर्वी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अमोल कोल्हेंची मुलगीही झळकली होती. एकूणच बॉलिवूडमध्ये दिसणारा हा स्टारकिड्सचा ट्रेंड आता मराठी मालिकेतही दिसू लागला आहे.
'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावेंच्या मुलाची एन्ट्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2019 10:41 AM (IST)
मंगळवारच्या भागात राजनंदिनीची शानदार एन्ट्री झाली. तिच्यासोबत छोटा जयदीपही दिसला. लहानपणीचा हा जयदीप दुसरा-तिसरा कोणी नसून सुबोध भावेंचा मुलगा मल्हार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -