Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या नव-नविन ट्विस्ट येत आहेत. इंद्राचे सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर मालिकेत एक वेगळचं वळण आलं आहे. इंद्राने गुंडागिरी सोडून चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पण समाज इंद्राला स्वीकारायला तयार नाही. 


देशपांडे सरांनी इंद्राला एका आठवड्याची मुदत दिली आहे. एका आठवड्यात इंद्रा सुधारला तर देशपांडे सर इंद्रा आणि दीपूच्या नात्याला मान्यता देणार आहेत. त्यामुळेच इंद्राने धडपड सुरू केली आहे. गुडांगिरी सोडून चांगलं काम करण्याचा निर्णय इंद्राने घेतला आहे. इंद्रा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण समाज त्याला स्वीकारायला तयार नाही. 






कार्तिक घेणार इंद्राची मुलाखत


'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात इंद्रा कार्तिकच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी जाणार आहे. दरम्यान कार्तिक इंद्राची मुलाखत घेणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी कार्तिक इंद्राला त्रास देताना दिसणार आहे. यासगळ्याचा दीपूला खूप त्रास होणार आहे. इंद्राचे सत्य देशपांडे सरांसमोर कार्तिकमुळे आले असून इंद्रा आणि दीपूचं नातं तुटावं यासाठी कार्तिक आणि सानिकाने अनेक प्रयत्न केले आहेत. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : इंद्रा करणार त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरी; कार्तिक घेणार मुलाखत


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; जयश्री-इंद्रामधला दुरावा दीपू करणार दूर