Star Pravah Muramba Serial Track : स्टार प्रवाहच्या (Star Pravah) मुरांबा मालिकेचं (Muramba Serial) कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. रमासारखीच हुबेहुब दिसणारी माही सध्या मालिकेत दिसत असल्यामुळे कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच मालिकेतून आणखी एक नवं पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साईनाथ शेवलकर असं या पात्राचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ खिरीड (Siddharth Khirid) साईनाथ हे पात्र साकारणार आहे.
साईनाथ हे पात्र अतिशय वेगळं आहे. मुळचा चंद्रपुरचा असणार साईनाथ पर्यटकांना गाड्या पुरवण्याचं काम करतो. पर्यटकांना ताडोबाच्या जंगलात घेऊन जातो. वैदर्भीय भाषा बोलतो. तसा शांत स्वभावाचा आहे. कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण कोणी त्याला चुकीचं वाटेल असं बोललं तर अचानक भडकतो. मरणासन्न अवस्थेत जेव्हा साईनाथला रमा दिसते, तेव्हा तो देवदुतासारखा धावून येतो आणि तिचा जीव वाचवतो. साईनाथच्या एन्ट्रीनं मालिकेतली रंगत द्विगुणीत होणार आहे.
मुरांबा मालिकेत नव्या पात्राच्या रुपात एन्ट्री घेणारा अभिनेता सिद्धार्थ खिरीड म्हणाला की, "स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. मुलगी झाली हो, मालिकेनंतर जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रवाह परिवारात सामील होण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. या मालिकेच्या निमितानं वैदर्भीय भाषा शिकण्याची संधी मिळाली. ही नवी भाषा आत्मसात करताना माझा कस लागतोय, मात्र सेटवर सर्वांच्या मदतीनं मी या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. मालिकेची टीम खूप छान आहे. सेटवर खूप छान पद्धतीनं सर्वांनीच मला आपलसं करुन घेतलं आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
धक्कादायक! वीर पहारियावर विनोद केला म्हणून कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण