मुंबई : 31 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 'सोयरे सकळ' या नाटकाने बाजी मारली आहे. भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित 'सोयरे सकळ' ला नाटकाला सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. 'हॅम्लेट' या नाटकाला द्वितीय, तर 'आरण्यक' या नाटकाला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गांधी हत्येच्या पार्श्वभूमीवर एका ब्राह्मण कुटुंबात झालेल्या नात्यांच्या गुंत्याची कथा 'सोयरे सकळ' या नाटकात पाहायला मिळते. ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकर, आशुतोष गोखले, अश्विनी कासार यांच्या नाटकात मुख्य भूमिका आहेत. भद्रकाली प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे.
भरत जाधव, प्रशांत दामले, सुमीत राघवन, उमेश कामत, सतीश राजवाडे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ऐश्वर्या नारकर, तेजश्री प्रधान, ऋता दुर्गुळे, प्रतिभा मतकरी, माधुरी गवळी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळवला आहे.
विशेष म्हणजे, प्रदीप मुळ्ये यांनी सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजना या दोन्ही विभागातील प्रथम आणि द्वितीय, तर वेशभूषेच्या द्वितीय पुरस्कारांवर नावं कोरली आहेत. म्हणजेच मुळ्ये यांना तब्बल पाच पारितोषिकं यंदा प्राप्त झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची पारितोषिके
सर्वोत्कृष्ट नाटक
प्रथम (7,50,000 रुपये) - सोयरे सकळ (भद्रकाली)
द्वितीय (4,50,000 रुपये) - हॅम्लेट (जिगिषा आणि अष्टविनायक)
तृतीय (3,00,000 रुपये) - आरण्यक (अद्वैत थिएटर्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम (1,50,000 रुपये) चंद्रकांत कुळकर्णी (हॅम्लेट)
द्वितीय (1,00,000 रुपये) आदित्य इंगळे (सोयरे सकळ)
तृतीय (50,000 रुपये) अद्वैत दादरकर (एका लग्नाची पुढची गोष्ट)
सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन
प्रथम (1,00,000 रुपये) डॉ. समीर कुलकर्णी (सोयरे सकळ)
द्वितीय (60,000 रुपये) रत्नाकर मतकरी (आरण्यक)
तृतीय (40,000 रुपये) दिग्पाल लांजेकर (ऑपरेशन जटायू)
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना
प्रथम (40,000 रुपये) प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट)
द्वितीय (30,000 रुपये) प्रदीप मुळ्ये (सोयरे सकळ)
तृतीय (20,000 रुपये) शितल तळपदे (आरण्यक)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
प्रथम (40,000 रुपये) प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट)
द्वितीय (30,000 रुपये) प्रदीप मुळ्ये (सोयरे सकळ)
तृतीय (20,000 रुपये) संदेश बेंद्रे (ऑपरेशन जटायू)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन
प्रथम (40,000 रुपये) राहुल रानडे (हॅम्लेट)
द्वितीय (30,000 रुपये) अजित परब (सोयरे सकळ)
तृतीय (20,000 रुपये) कौशल इनामदार (आरण्यक)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
प्रथम (40,000 रुपये) गीता गोडबोले (सोयरे सकळ)
द्वितीय (30,000 रुपये) प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट)
तृतीय (20,000 रुपये) मेघा जकाते (आरण्यक)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
प्रथम (40,000 रुपये) सचिन वारीक (सोयरे सकळ)
द्वितीय (30,000 रुपये) उल्लेश खंदारे (हॅम्लेट)
तृतीय (20,000 रुपये) उल्लेश खंदारे (आरण्यक)
उत्कृष्ट अभिनय - रौप्यपदक आणि 50,000 रुपये
पुरुष कलाकार : भरत जाधव (वन्स मोअर), प्रशांत दामले (एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (हॅम्लेट), उमेश कामत (दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (अ परफेक्ट मर्डर)
स्त्री कलाकार : ऐश्वर्या नारकर (सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (तिला काही सांगायचंय), ऋता दुर्गुळे (दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (आरण्यक), माधुरी गवळी (एपिक गडबड)
अंतिम फेरीत दहा व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शितल क्षीरसागर यांनी काम पाहिलं.
राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत 'सोयरे सकळ'ची बाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2019 05:12 PM (IST)
भरत जाधव, प्रशांत दामले, सुमीत राघवन, उमेश कामत, सतीश राजवाडे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ऐश्वर्या नारकर, तेजश्री प्रधान, ऋता दुर्गुळे, प्रतिभा मतकरी, माधुरी गवळी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -