मुंबई : 'झी मराठी'वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीमध्येही ही मालिका अव्वल स्थानावर असते. सध्या या मालिकेने रंजक वळण घेतलं आहे. सुरुवातीला गृहिणी, साधी भोळी असणारी राधिका सुभेदार आता एका मोठ्या कंपनीची मालकीण बनली आहे. इतकंच नाही तर गुरुनाथ सुभेदार ज्या कंपनीचा सीईओ होता, ती कंपनीही राधिकाने विकत घेतली आहे.

मात्र मालिकेच्या या ट्रॅकची घराघरातच नाही तर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. व्हॉट्सअॅप असो किंवा ट्विटर, फेसबुक 'राधिका मसाले'चा सर्वत्र बोलबाला आहे. राधिकाने 300 कोटी रुपयांत एक कंपनी विकत घेतल्यावरुन अनेक जोक्स तुफान शेअर होत आहे. काहींनी मीम्स बनवून आपली क्रिएटिव्हिटीच जणू दाखवून दिली आहे.

गुगलवर टॉप रिचेस्ट पीपल इन इंडिया असं सर्च केल्यास विप्रोच्या अझीम प्रेमजी आणि लक्ष्मी मित्तल यांच्याही आधी राधिकाचं नावं येतं, असं मीम तयार केलं आहे. तर 4 बायकांना कामावर घेऊन मसाले कुटून राधिका मसाले आता 300 करोड रुपयांना नवीन कंपनी विकत घेत आहे. सीरियल संपेपर्यंत बहुतेक रिलायन्स कंपनी सुद्धा विकत घेईल... असा मेसेजही शेअर केला जात आहे.

राधिका मसालेवरील जोक्स

तीन महिन्यापूर्वी तीनशे रुपये जवळ नसणारी राधिका 300 कोटींची कंपनी विकत घेते.
यावर मोदी भक्तांचे म्हणणे आहे की हे 'मेक इन इंडिया'चे यश आहे तर विरोधी पक्षांचा आरोप आहे की हा नक्की महाघोटाळा आहे. ????????????


"राधिका मसाले" ह्या कंपनीचे शेअर्स जिथे!! मिळतील तिथे खरेदी करा ....
थोड्याच दिवसात त्यांचे भाव गगनाला भिडणार आहेत ...
#माझ्या नवऱ्याची बायको ????????????

मसाल्याच्या उद्योगात प्रचंड कमाई करणारे दोनच व्यक्ती ....
१) वास्को द गामा
आणि
२) राधिका सुभेदार
????????????????????????

४ बायकांना कामावर घेऊन मसाले कुटून राधिका मसाले आता ३०० करोड रुपयांना नवीन कंपनी विकत घेत आहे.
सीरियल संपेपर्यंत बहुतेक रिलायन्स कंपनी सुद्धा विकत घेईल...
# माझ्या नवऱ्याची बायको #

राधिका मसाले म्हणे पतंजलीला टेक over करणार आहे.

With this pace Radhika masale will take over Microsoft in few months


'राधिका मसाले'वरील मीम्स