मुंबई : वैविध्यपूर्ण कथा आणि अनोखी विषयमांडणी असणारी ‘सिंधू’ नावाची नवीन मालिका 'झी 5' वर सुरु झाली असून या मालिकेचे प्रोमो सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अर्थातच त्याला एकोणिसाव्या शतकाचा बाज आहे. या मालिकेत सिंधू नावाच्या निरागस मुलीची उत्कट कथा बघायला मिळणार आहे. या मालिकेत तिचे बालपण, शिक्षण, लग्न अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवरील संघर्ष यानिमित्त प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सिंधुचा प्रवास सर्व महिलांसाठी खरोखर प्रेरणादायक असून विशेषत: ज्यांना सामाजिक नियमांपासून मुक्त होऊ इच्छितात.
या मालिकेत अदिती जलतरे, श्रीहरी अभ्यंकर, वेद आंब्रे, सौरभ सुतार, वंशिका इनामदार असे चिमुकले कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत असून गौरी किरण, पूजा मिठबावकर, शाश्वती पिंपळीकर, प्रसाद दाबके, निकिता कुलकर्णी आदींच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिरीयल मधील पाच सीन चुकवू नये असे आहेत.
जेव्हा सिंधू घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतेसिंधूची सावत्र आई भामिनीने तिचे लग्न सिंधूपेक्षाही वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. भावी वराला पाहून ती घाबरून गेली. तिला इतक्या लवकर लग्न करायचं नाही आणि त्याऐवजी शिक्षण घ्यायचं आहे. सिंधूने रात्री घरातून पळ काढण्याचा निर्णय घेतला.
अण्णा
कुटुंबातील अण्णांची बहीण ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी गोदावरीचा बचाव करू शकते. तिला माहित आहे की गोदावरीचा तिच्या सासरच्या लोकांकडून छळ होत आहे म्हणूनच ती तिच्या पाठीशी उभी आहे.
अण्णा बालविवाहाच्या विरुद्ध उभे राहतात
घरातील मंडळी देवव्रत आणि सिंधूच्या लग्नाची योजना आखत आहे हे कळताच अण्णा संतापले. कारण अण्णा पुरोगामी विचाराचे असून बालविवाहासारख्या प्रथांचा विरोध करतात. त्यांना समाजात बदल घडवायचा आहे म्हणूनच ते आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात आहे.
लेले गुरूजी
या मालिकेत लेले गुरुजी हे असेच एक पात्र आहे जे सिंधूला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करतात. ते सिंधूची लग्नपत्रिका परस्पर जुळवून सिंधूचे लग्न देवव्रत बरोबर जुळून आणतात. लेले गुरुजींना याची पूर्ण कल्पना असते जर सिंधूचा विवाह देवव्रतशी झाला तर तिला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
सिंधूचे बाबा
सिंधू लहान असल्याने लग्नानंतर तिला सासरच्या घरी राहावे लागणार याची जाणीव नाही. ती वडिलांना सोबत येण्यास सांगते. तिचे वडील तिला पटवून देतात की हे रितीविरोधात आहे प्रत्येक मुलीला आयुष्यात हे पाऊल उचलावे लागते. सिंधूला वडिलांचे म्हणणे पटते आणि सिंधू तिच्या वडिलांच्या सूचनांचे पालन करते आणि तिची नवीन भूमिका स्वेच्छेने स्वीकारते.